लोकसभेत शिवसेनेला पाच जागाही मिळणार नाही : संजय राऊत

    26-May-2023
Total Views |

Sanjay Raut (1)

संजय राऊत आणि उद्धव ठाकरे

मुंबई  : शिंदेंच्या टोळीने ४८ जागा लढवाव्यात आम्हाला काहीही फरक पडत नाही. लोकसभेतील खासदारांचा आमचा आकडा १९ इतकाच राहील. शिंदे गट हा पक्ष नाहीच. त्यामुळे त्यांच्याकडे कुठलीही विचारधारा नाही. पक्ष म्हणून त्यांच्याकडे काही बैठका नाहीत. कुणी काहीही म्हणो आमचे लोकसभेतील बलाबल हे कायम राहील. या माझ्या वक्तव्यावर कुणी काहीही टीका केली तरीही आम्हाला काहीही फरक पडत नाही. शिवसेनेने २२ काय ४८ जागा जरी लढविल्या तरीही त्यांच्या पाचही जागा निवडून येणार नाहीत, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
जागावाटपावरुन सध्या महाविकास आघाडीत धुसफूस सुरूच आहे. यापूर्वी प्रत्येक पक्षाला १६ जागा देणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, याला काँग्रेससह संजय राऊतांनी ठाकरे गट म्हणून विरोध केला होता. उद्धव ठाकरे गटाला आत्ताच्या महाराष्ट्रातील १८ आणि दादरा नगर हवेलीतील १ जागा अशा मिळून १९ जागा कायम ठेवायच्या आहेत, असा दावा संजय राऊतांनी केला आहे. शरद पवारांनी याबद्दल सावध भूमिका घेत आम्ही जागावाटपासाठी बसू तेव्हा हा निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले आहेत. काँग्रेस अध्यक्ष नाना पटोलेंनीही जागावाटपावरुन संजय राऊतांना सुनावले होते.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.