राधे मा चा मुलगा रणदीप हुद्दा यांच्यासोबत दिसणार ‘या’ वेबसिरीज मध्ये

    26-May-2023
Total Views |

radhe ma 
 
मुंबई : राधे माँ यांच्या मुलाचं नाव हरजिंदर सिंह आहे. हरजिंदर एक अभिनेता असून त्याने अनेक सिनेमांमध्ये काम देखील केलं आहे. राधे माँ यांच्या मुलगा बॉलिवूडमध्ये यशाच्या उच्च शिखरावर चढत आहे. सध्या हरजिंदर त्याच्या आगामी प्रोजेक्टमुळे चर्चेत आहे. हरजिंदर लवकरच अभिनेता रणदीप हुड्डा याच्यासोबत ‘इंस्पेक्टर अविनाश’ या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे.
 
राधे मा या मूळच्या पंजाब येथील सुखविंदर कोर. राधे माँ यांचं मुंबईमध्ये आश्रम आणि एक मंदिर आहे. राधे माँ अनेकदा जागरण आणि सत्संग आयोजित करतात. यादरम्यान त्यांच्या दर्शनासाठी हजारो लोक जमतात. मात्र राधे माँ यांचं दर्शन घेण्यासाठी भक्तांना मोठी रक्कम मोजवी लागते.
 
महत्त्वाची गोष्ट म्हणजे राधे माँ यांचे आशीर्वाद घेण्यासाठी सामान्य लोकच नाही तर झगमगत्या विश्वातील सेलिब्रिटी देखील रांग लावतात. मनोज तिवारी, रवी किशन, मनोज बाजपेयी, डॉली बिंद्रा आणि गजेंद्र चौहान या दिग्गजांच्या नावांच्या नावाचा या यादीमध्ये समावेश आहे. पण भक्तांना दर्शन देण्यासाठी राधे माँ लाखो रुपये आकारतात.