विश्वास पाटील यांचा पुस्तक प्रकाशन सोहळा म्हणजे ‘फॅन मोमेन्ट’ - अमोल कोल्हे

26 May 2023 11:59:08

anol kolhe vishvas patil 
 
मुंबई : "हा सोहळा ही माझ्यासाठी खऱ्या अर्थाने ‘फॅन मोमेन्ट’ होती. कारण कॉलेजमध्ये शिकत असताना विश्वास पाटील सरांची 'संभाजी' ही कादंबरी वाचून मी खूप भारावून गेलो होतो आणि त्या कादंबरीची अनेक पारायणं मी केली." काही दिवसांपूर्वी झालेल्या कादंबरीकार विश्वास पाटील लिखित महासम्राट या साहित्य मालिकेचा दुसरा खंड ‘रणखैंदळ’ चे प्रदर्शन खासदार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते झाले. हा कार्यक्रम झाल्यानंतर आज त्यांनी त्याबद्दल फेसबुक पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
 
ते पुढे म्हणतात, "त्या काळात ज्याप्रमाणे पानिपत कादंबरीवरील रणांगण हे नाटक गाजत होतं, त्याप्रमाणेच छत्रपती संभाजी महाराजांवरील एखादं नाटक रंगभूमीवर यावं, अशी तीव्र इच्छा मनात निर्माण झाली. त्या भारावलेल्या अवस्थेतच मी तेव्हा अंधेरीमध्ये पाटील सर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असताना त्यांना प्रत्यक्ष भेटून माझी ही इच्छा प्रदर्शित केली होती. तेव्हा विद्यार्थीदशेत त्यांचा एक सामान्य चाहता म्हणून मी त्यांना भेटलो होतो आणि आज तब्बल सुमारे १९ वर्षांनंतर त्यांच्या कादंबरीच्या प्रकाशनाचा मान मला मिळाला. माझ्यासाठी याहून मोठे सद्भाग्य ते काय !"
 
अनंतर हि कादंबरी प्रेक्षकांना आवडेल असे म्हणत त्यांनी विश्वास पाटील यांच्या लेखनशैलीचा कौतुक केले.
Powered By Sangraha 9.0