पंतप्रधान मोदींच्या हस्ते नव्या संसदेचे राष्ट्रार्पण होणार ; सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब

26 May 2023 18:42:04
new Parliament House Narendra Modi

नवी दिल्ली
: नव्या संसदेचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हावे, यासाठी लोकसभा सचिवालयाला निर्देश देण्याची विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली आहे. त्यामुळे रविवार, दि. २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते नव्या संसदेचे राष्ट्रार्पण होणार आहे. न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी आणि न्या. पीएस नरसिम्हा यांच्या सुट्टीतील खंडपीठाने सांगितले की, “याचिकाकर्ते वकील सीआर जया सुकीन यांच्याकडे अशा याचिका दाखल करण्याचे कोणतेही उचित स्थान नाही. त्याचप्रमाणे अशी याचिका दाखल केल्याप्रकरणी न्यायालय दंड करत नसल्याने याचिकाकर्त्यांनी आभार मानावेत,” असे न्यायालयाने फटकारले आहे.

यावेळी याचिकाकर्त्याने याचिका मागे घेण्याची परवानगी मागितली. मात्र, न्यायालयाने तशी परवानगी देण्याचे नाकारले आणि याचिका स्पष्टपणे फेटाळून लावली. त्याचवेळी, याचिका मागे घेण्याची परवानगी देणे म्हणजे याचिकाकर्त्यास उच्च न्यायालयात जाण्याचे स्वातंत्र्य प्राप्त होते, याकडे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी लक्ष वेधले. दरम्यान, या सोहळ्यावरून राजकीय नाट्य पाहायला मिळत असून हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला त्यातूनच नवीन संसद भवनाचे उद्घाटन भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात यावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र, ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे राष्ट्रार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

अनेक विरोधी पक्षांनी या समारंभाला विरोध केला आहे. मात्र, चार विरोधी पक्षांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याला पाठिंबा दर्शवला आहे. पंजाबमधील राजकीय पक्ष अकाली दल सहभागी होणार आहे. त्याशिवाय ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा बीजू जनता दल, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचा पक्षही उद्घाटन सोहळ्याला उपस्थित असणार आहे.

उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यादेखील नवीन संसद भवनाच्या वास्तू चार विरोधी पक्षांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याला पाठिंबा दर्शवला आहे. पंजाबमधील राजकीय पक्ष अकाली दल सहभागी होणार आहे. त्याशिवाय ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा बीजू जनता दल, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचा वायएसआरसीपी पक्षही उद्घाटन सोहळ्याला उपस्थित असणार आहे. उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यादेखील नवीन संसद भवनाच्या वास्तू उद्घाटन सोहळ्याला हजर राहतील. सोहळ्याला हजर राहण्याची शक्यता आहे.

विरोधकांच्या वर्तनाचा बुद्धिजीवींकडून निषेध

दहा राजदूत, १०० निवृत्त सशस्त्र दल अधिकारी आणि ८२ शिक्षणतज्ज्ञांसह ८८ निवृत्त अधिकार्‍यांसह २७० प्रतिष्ठित नागरिकांनी संसद भवनाच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकणार्‍या विरोधी पक्षांच्या वर्तनाचा निषेध करणारे खुले पत्र लिहिले आहे.

नव्या ससंदेच्या प्रतिमेचे ७५ रुपयांचं नाणं!

नवीन संसद भवनाच्या इमारतीचे लोकार्पण स्मरणात राहावे, यासाठी अर्थ मंत्रालयाकडून विशेष ७५ रुपयांचे नाणे वितरित केले जाणार आहे. या नाण्यावर या नवीन संसद भवनाची प्रतिमा तसेच त्याचे नावदेखील देण्यात येईल. ७५ रुपयांचे हे नाणे चार धातूंपासून बनवले जाईल. ज्यामध्ये ५० टक्के चांदी, ४० टक्के तांबे, पाच टक्के निकल आणि पाच टक्के झिंक वापरले जाणार आहे. तसेच, यावर नवीन संसद भवन इमारतीखाली २०२३ देखील लिहिलेलं असेल. नाण्याच्या समोरच्या बाजूस मध्यभागी अशोक स्तंभावरील सिंह आणि सत्यमेव जयते लिहिलेलं असेल. नाण्यावर देवनगरी लिपीत भारत आणि इंग्रजीत ‘इंडिया’ लिहिलेलं असेल. तसेच ‘संसद भवन’ हे शब्ददेखील देवनागरी आणि इंग्रजी भाषेत दिले जातील.

Powered By Sangraha 9.0