नाना पटोलेंना काँग्रेस नेत्यांचाच दणका! पक्षाध्यक्षपदही जाणार?

नाना पटोलेंच्या विरोधात काँग्रेसचं शिष्टमंडळ दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या भेटीला

    26-May-2023
Total Views |
 
Nana patole
 
 
नवी दिल्ली : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात माजी मंत्री विजय वडेट्टीवार आणि माजी मंत्री सुनील केदार त्यांच्या समर्थकांसह दिल्लीत दाखल झाले आहेत. प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या कार्यपद्धतीवरून वडेट्टीवार आणि केदार यांच्यासह त्यांचे समर्थक नाराज आहेत.
 
चंद्रपूर बाजार समितीच्या निवडणुकीत वडेट्टीवार यांच्या समर्थकांची नाराजी पटोले यांच्याविरोधात दिसून आली होती. चंद्रपूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रकाश देवतळे व ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष दिवाकर निकुरे यांना प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी पदमुक्त केले आहे. दुसरीकडे, केदार यांच्याशीही पटोले यांचे मतभेद आहेत.
 
यामुळे नाना पटोलेंच्या विरोधात काँग्रेसचं शिष्टमंडळ दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या भेटीला गेलं आहे. शिवाय आता, नाना पटोलेंचं पक्षाध्यक्षपदही जाणार? अशा चर्चा रंगु लागल्या आहेत.
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.