शासन जनतेच्या दारी जातं, काहीजण एकमेकांच्या दारी : मुख्यमंत्री शिंदे

26 May 2023 17:48:41
Eknath Shinde maharahstra

मुंबई
: शासन जनतेच्या दारी जात आणि काहीजण एकमेकांच्या दारी जातात, असा अप्रत्यक्ष टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे गटाला लगावला. ते 'हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्ग' लोकार्पण सोहळ्यादरम्यान बोलत होते. तसेच, सुप्रीम कोर्टाने जसा मार्ग मोकळा केला तसा समृध्दी महामार्ग मोकळा केला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले .

शेतकऱ्यांना त्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळत नसल्याचे एका शेतकऱ्यांने मुख्यमंत्र्यांना सांगितले. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्यात दखल घेऊन त्या शेतकऱ्याला मोबदला मिळवून दिला. तसेच, देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदी यांच्या पुढाकारातून समृध्दी महामार्ग तयार झाला, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच या समृध्दी महामार्गातून शेतकऱ्याचे भले होत आहे आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी हा महामार्ग महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटले.

दरम्यान, राज्यातील सर्व रस्ते हे द्रुतगती महामार्गाने जोडणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने हे सगळे शक्य झाल्याचे शिंदे म्हणाले. उपमुख्यमंत्री फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे समृध्दी महामार्ग करण्याचे ठरले. आणि तो पूर्णत्वास जात आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक नागरिकांपर्यंत योजना राबविणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

राज्यात प्रत्येक ठिकाणाला अॅक्सेस रिमोटने जोडतो आहे. त्यामुळे दळणवळणाच्या सुविधा वाढविण्यावर सरकारचा भर असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. त्यामुळे समृध्दी महामार्गातून राज्यातील शेतकरी हा समृध्द होणार आहे, असा दावा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला. 

Powered By Sangraha 9.0