नाना पटोले, संजय राऊत बोलघेवडे लोकं: देवेंद्र फडणवीस
26-May-2023
Total Views |
मुंबई : नाना पटोले, संजय राऊत बोलघेवडे लोकं आहेत. असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. विरोधकांना कितीही पोटदुखी झाली तरी मोदी वैश्विक नेतेच आहेत. लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याचं देखील फडणवीस यांनी सांगितलं. २६ मे रोजी, देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हीआयपी शासकीय विश्रामगृह इमारतीचे भूमिपूजन होणार आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे गुरुवारी रात्री अहमदनगरला आगमन झाले. शुक्रवारी त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी फडणवीस म्हणाले, "जलयुक्त शिवराची मोठ्या प्रमाणात कामं झाली आहेत. 257 कामे दुसऱ्या टप्प्यात घेतली आहेत. गाळयुक्त धरण, प्रधानमंत्री आवास योजनांअंतर्गत 18 हजार 600 घरं पूर्ण. आता नवीन टार्गेट दुप्पट करणार आहोत. वेगवेगळ्या योजनांचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. याची सुरवात झालेली आहे. राळेगणसिद्धी येथे आपण सौरऊर्जा सुरु केले. आता जिल्हात 800 फिडर ठिकाणी सुरु करणार. अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान शेतकऱ्यांना मिळालं आहे. सततच्या पावसाचा निधी आपण रिलीज करतोय. लवकरात लवकर पैसे देण्यासंदर्भात मी जिल्हाधिकारी यांना सांगितलं आहे. शासन आपल्या दारी ही योजना सुरु केली आहे. निळवंडे संदर्भात बैठलं झाली आहे." अशाप्रकारे नगरमधील शेती, विकासकामांचा आढावा फडणवीसांनी घेतला.