तोकडे कपडे घालून मंदिरात जाणाऱ्यांना सुनावले, म्हणाली,"वेटीकन सिटीत मला..."

    26-May-2023
Total Views |
Bollywood actress Kangana Ranaut

मुंबई
: बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने तोकडे कपडे घालून जाणाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. ती म्हणाली, मला वेटीकन सिटी परिसरातदेखील तोकडे कपडे घालून जाण्यास मनाई केली होती. तसेच, मंदिर परिसरात तोकडे कपडे घालून जाणाऱ्या तरुणींना तिने फटकारले असून, तोकडे कपडे घालून मंदिरात प्रवेश करणाऱ्यावर कडक नियमांद्वारे बंदी घातली पाहिजे. तसेच कडक नियम करून कारवाई करण्याची मागणी तिने सोशल मीडिया पोस्टद्वारे केली आहे. समाजमाध्यमांवर तिने ट्विट केले होते ते ट्विट पुन्हा एकदा रिट्विट करत ही मागणी केली आहे.

दरम्यान, या पोस्टला रिट्विट करत कंगना रणौतने मंदिरांमध्ये जाण्याच्या कठोर नियमांबद्दल सांगितले आहे. तिने सदर ट्विटमध्ये लिहिले, “हे पाश्चिमात्य कपडे आहेत, जे गोर्‍या लोकांनी बनवले आहेत आणि त्यांचा प्रचार केला आहे. मी एकदा व्हॅटिकनमध्ये शॉर्ट्स आणि टी-शर्टमध्ये होतो आणि मला आवारात प्रवेश देखील दिला गेला नाही. कपडे बदलण्यासाठी मला हॉटेलवर परत जावे लागले. नाईट ड्रेस घातलेले हे विदूषक अनौपचारिक कपड्यांमध्ये आळशी आणि मूर्ख असल्याशिवाय दुसरे काही नाहीत. यामागे दुसरा काही हेतू असेल असे मला वाटत नाही, या मूर्खांसाठी कठोर नियम असावेत." अशा आशयाचं ट्विट कंगनाने केले आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.