सेन्सेक्स आणि बॅंकेक्स डेरिव्हेटिव कॉन्ट्रॅक्ट्सची साप्ताहिक समापनानंतर १७,३४५ कोटी रुपयांची उलाढाल

    26-May-2023
Total Views |
BSE LIMITED sensex

मुंबई
: S&P BSE सेन्सेक्स आणि S&P BSE बॅंकेक्स डेरिव्हेटिव कॉन्ट्रॅक्ट्स, जे काही काळापुर्वी पुन्हा एकदा बाजारात आणले होते, त्यांनी बीएसईमध्ये आज आपल्या दुसऱ्या शुक्रवारी साप्ताहिक समापनानंतर रू. १७,३४५ (रू.सतरा कोटी तीनशे सोळा लाख ऑप्शन्स आणि रू.२९ कोटी फ़्युचर्स) कोटींची उलाढाल केली. बीएसई लिमिटेडने यामुळे टर्नओव्हर आणि ओपन इंटरेस्ट दोन्हीमध्ये सातत्याने वाढ होताना बघितली आहे , यातील आगळीवेगळी बाब म्हणजे यांची समापन तिथी ही शुक्रवारीच असते.

यामध्ये ९८,२४२ व्यवहारांच्या मार्फ़त एकूण २,७८,३४१ कॉन्ट्रॅक्ट्सचा व्यवहार झाला. समापनापुर्वी , एकूण ओपन इंटरेस्ट हा २०,७०० कॉन्ट्रॅक्स्ट्सचा होता ज्याची किंमत ही रू.१,२८० कोटी एवढी होती. “या कॉन्ट्रॅक्ट्समध्ये दिसून येणारी सक्रियता हेच दर्शविते की बाजारामधील भागीदारांना नव्या उत्पादनांमध्ये रस तर आहेच पण त्याची उपयुक्तता देखील आहे.”असे असे बीएसई चे एमडी आणि सीईओ असलेले सुंदरारमण राममुर्थी म्हणाले.

बीएसई (पुर्वीचे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ) जे पुन्हा आपल्या लहान आकारातील सेन्सेक्स ॲन्ड बॅंकेक्स फ़्युचर कॉन्ट्रॅक्ट्स घेऊन आले होते, त्यांची समापन तिथी शुक्रवार १५ मे २०२३ होती. ही पुनरावृत्ती बाजारातील प्रतिक्रियांवर आधारीत असून गुंतवणूकदारांना आणि इतर बाजारातील भागीदारांना गुंतवणूकीचे विस्तृत पर्याय प्रदान करण्याच्या उद्देशाने केली गेली होती.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.