शिवभक्तावर गुन्हा दाखल करणाऱ्या सिल्लोडमधील पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई!

    26-May-2023
Total Views |
 

sillod
 
 
सिल्लोड : संभाजी महाराज आणि औरंगजेबाचे चित्र समाज माध्यमांवर शेअर करणाऱ्या युवकावर अजामीनपात्र गुन्हा दाखल करणारे सहायक फौजदार भागीनाथ वाघ यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. औरंगाबाद पोलीस अधीक्षक कार्यालयातून वाघ यांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले आहेत. स्टेटस ठेवल्यामुळे अजामीनपात्र गुन्हा दाखल करून घेणाऱ्या पीएसआय भागीनाथ वाघ याचे निलंबन केले आहे.
 
 
 
 
मुघल आक्रमणकारी औरंगजेब आणि त्याच्या डोक्यावर पाय ठेवून उभे असलेले संभाजी महाराज या आशयाचे छायाचित्र समाज माध्यमांवर प्रसारित केल्याप्रकरणी एका शिवभक्तावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात हा प्रकार घडला आहे. शिवभक्तावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने राज्यातील विविध भागांमधून या विरोधात संताप व्यक्त करण्यात आला असून गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात होती. 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.