'द क्रिएटर सर्जनहार' च्या प्रदर्शनावरून वाद का?

25 May 2023 19:01:54

sarjanhar 
 
मुंबई : 'द केरळ स्टोरी' सिनेमाविषयी जोरदार विरोध प्रदर्शन पहायला मिळालं. त्यानंतर आता या नव्या 'द क्रिएटर सर्जनहार' सिनेमाविरोधात हिंदू संघटना आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. अहमदाबादच्या ज्या चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होत होता तिथे बजरंग दलाने आंदोलन केल्याने प्रयोग खोळंबला. दरम्यान हा चित्रपट हिंदू मुस्लिम समाजात तेढ वाढवणारा असून यात लव्ह जिहाद दाखवण्यात आलेला आहे असा आरोप होताना दिसतो. सादर चित्रपट दि. २६ मी रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार असून त्यानंतरच चित्रपटाविषयीच्या चर्चाना विराम मिळेल.
 
अहमदाबादच्या मल्टिप्लेक्स बाहेर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एका सुरात जय श्रीराम अशा घोषणा दिल्या. यादरम्यान कार्यकर्त्यांनी असं देखील सांगितलं की ते हिंदू धर्माच्या बचावासाठी कायम सज्ज आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे ज्यात सर्व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी भगव्या रंगाचा शेला ओढला आहे. आणि जोरजोरात जय श्री राम अशी घोषणाबाजी करत आहेत आणि सिनेमावर बंदी आणण्याची मागणी करत आहेत.
 
या सिनेमात सीआयडी मध्ये दया ही व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता दयानंद शेट्टी मुख्य भूमिकेत आहे. याव्यतिरिक्त या सिनेमात शाजी चौधरी,रोहित चौधरी,रजा मुराद,नीलू कोहली,अनंत महादेवन आणि आर्या बब्बर सारखे कलाकार देखील आहेत. हा सिनेमा देशभरात अनेक ठिकाणी २६ मे रोजी रिलीज होईल. या सिनेमाचं दिग्दर्शन परवीन हिंगोनियानं केलं आहे तर याची निर्मिती राजेश कराटे गुरुजीनी केली आहे.
Powered By Sangraha 9.0