संदीप खरे सांगतात शेरलॉक होम्सचं वैशिष्ट्य

    25-May-2023
Total Views |


sherlock holmes 
 
मुंबई : शेरलोक होमसच्या कथांवर आधारित ऑडिओबुकस स्टोरीटेलवर लवकरच प्रसिद्ध होत आहेत. त्यापैकी काही भाग कवी व गीतकार संदीप खरे यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आले आहेत. यंनिमित्त लेखक व मुलाखतकार विनायक पचलग यांनी संदीप खरे यांची मुलाखत घेतली. यावेळी शेरलोकची स्वभाव वैशिष्ट्ये संदीप यांनी उलगडून सांगितली.
 
संदीप खरे म्हणाले, “शेरलॉक होम्स आजही सर्वांना आवडतो, आवडत राहतो आणि त्याचे कारण म्हणजे तो माणूस झाला, मित्र झाला जसं हॅरी पॉटर आजच्या मुलांचा मित्र झाला तसेच शेरलॉक होम्सबद्दल म्हणता येईल. शेरलॉक होम्स (Sherlock Holmes) हे स्कॉटिश लेखक सर आर्थर कॉनन डॉयल यांनी लिहिलेल्या कथानकांमधील नायकाचे नाव आहे. होम्स हे व्यवसायाने खाजगी गुप्तहेर आहेत. अविश्वसनीय चातुर्य असलेले होम्स आधुनिक विज्ञान, रसायन शास्त्र आणि सूक्ष्म निरीक्षणाचे वापर करून अनेक अवघड गुन्हे सोडवत असे. शेरलॅाक होम्सच्या या कथा जगप्रसिद्ध असून तो आणि त्याचा सहकारी डाॅ. वाॅटसन हे जगभरातील गुप्तहेरकथा वाचकांच्या आणि कुमार वाचकांच्या गळ्यातील अजरामर काळासाठीचे ताईत बनले आहेत, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.”
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.