हिंदुस्तानच्या संसदेचं उद्घाटन मोदी नाही तर पाकिस्तानचा पंतप्रधान करणार का?

25 May 2023 18:04:00
new-parliament-building-inauguration-congress-leader-acharya-pramod-on-pm-modi
 
नवी दिल्ली : काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याबाबत इतर काँग्रेसजनांपेक्षा वेगळे विधान केले आहे. ते म्हणाले की, देशाच्या संसदेचं उद्घाटन मोदी नाही तर पाकिस्तानचा पंतप्रधान करणार का? तसेच त्यांनी ट्विट केले की, "संसद सभागृह 'भाजप'चे नाही तर संपूर्ण देशाचे आहे. मोदींना विरोध करणे ठीक आहे, पण 'देश'ला विरोध करणे योग्य नाही".

आचार्य प्रमोद कृष्णम यांचे हे विधान तेव्हा समोर आले आहे, जेव्हा काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. काँग्रेस पक्षाने दि. २४ मे रोजी समविचारी विरोधी पक्षांना निवेदन जारी करून म्हटले आहे की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना या कार्यक्रमातून वगळणे हा केवळ राष्ट्रपतींचा अपमानच नाही तर लोकशाहीवरही हल्ला आहे.
 
दरम्यान नवीन इमारतीच्या उद्घाटनावरून झालेल्या गदारोळात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दि. २४ मे रोजी सांगितले की, "संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनासाठी २८ मे रोजी सर्व राजकीय पक्षांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यानुसार निर्णय घेतील. कार्यक्रमाचा राजकारणाशी संबंध जोडू नये, असे ते म्हणाले.

गृहमंत्री म्हणाले की "नवीन संसद भवन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचे उदाहरण आहे". त्यांनी सांगितले की, उद्घाटनाप्रसंगी पंतप्रधान संसद भवनाच्या बांधकामात योगदान देणाऱ्या ६०,००० मजुरांचा सन्मानही करतील.


Powered By Sangraha 9.0