"अमरावतीत ८०० मुस्लीम मुली काफीर!" मशिदीजवळ वाटली हिंदूविरोधी पत्रके!

https://twitter.com/psamachar1/status/1661314198129844225

    25-May-2023
Total Views |
madhya-pradesh-objectionable-pamphlets-distributed-in-indore-against-rss-bajrang-dal-claim-bhagwa-love-trap

इंदूर
: आजघडीला देशाच्या अनेक भागामध्ये एखादा तरुण मुस्लिम मुलींसोबत दिसल्यामुळे इस्लामिक कट्टरतावादी गटांकडून हिंदूंना लक्ष्य केल्यांच्या घटना घडत आहेत. नुकतेच मध्य प्रदेशातील इंदूरमधील एका मशिदीजवळ हिंदुविरोधी पत्रक वाटल्याचे प्रकरण समोर आले आहे. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि बजरंग दलावर मुस्लिम मुलींना धर्मभ्रष्ट (काफिर) बनवण्याचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. या षडयंत्राला 'भगवा लव्ह ट्रॅप' असे नाव देण्यात आले आहे.

या पत्रकात मुस्लिम मुलींना म्हटले होते, “तुमच्या विश्वासाची किंमत ७ जमीन आणि ७ आकाशांपेक्षा जास्त आहे. तुमचा सन्मान संपूर्ण जगाच्या मुस्लिमांच्या जीवापेक्षा अधिक मौल्यवान आहे. तुला तुझ्या वडिलांचा अभिमान आहे, तुला तुझ्या भावाचा अभिमान आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबाचा सन्मान आहात. तू सामान्य नाहीस, तर इस्लामची राजकुमारी आहेस. या पत्रकामुळे मुस्लिम संघटनानी आरएसएस आणि बजरंग दल दरवर्षी १० लाख मुस्लिम मुलींना धर्मत्यागी (काफिर) बनवून त्यांच्या इज्जतीला कलंक लावू इच्छित असल्याचा आरोप केलाय. तसेच, महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये ८०० हून अधिक मुस्लिम मुली काफिर झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून मुस्लीम मुलींना शाळा-कॉलेजांमध्ये अडकवले जाते, असे या पत्रकात म्हटले आहे. तसेच त्या लिहलंय की, “बहीण, बळी पडू नका. भगव्या प्रेमाच्या जाळ्यात अडकू नका. काही दिवस खोट्या सुख, भेटवस्तू आणि पैशाची लालूच दाखवून तुमचा संसार तुमचं भविष्य खराब करू नका. तुमची काही चूक झाली असेल तर परत या, तुमचा भाऊ तुम्हाला मदत करायला तयार आहे. अल्लाह तुमचा विश्वास, सन्मान आणि प्रतिष्ठेचे रक्षण करा, आमिन."

एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार २३ मे रोजी रात्री रावजी बाजार परिसरातील कलालकुई मशिदीमागे हिंदूंना काफिर म्हणत ही पत्रिका वाटण्यात आल्याची माहिती हिंदू संघटनेच्या लोकांसह एक महिलेने दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.