हिंडेनबर्गच्या हल्ल्यानंतरही अदानींची घोडदौड सुरूच! एलआयसीचा नफा ४६६ टक्क्यांनी वाढला!

    25-May-2023
Total Views |
lic-2022-23-quarter-4-profit-increase-466-percent-gautam-adani-in-top-20-billionaire


नवी दिल्ली: देशाची सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्या घसरणीचा काळ फार लोटला नाही. हिंडेनबर्गने दिलेल्या अहवालामुळे ही परिस्थिती गौतम अदानी यांच्या आली होती. मात्र आता एलआयसीने आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. त्यात विमा कंपनीचा नफा (एलआयसी नफा) ४६६ % वाढून १३४२८ कोटी रूपये झाला आहे. दुसरीकडे, गौतम अदानींचे नाव श्रीमंतांच्या यादीत पुन्हा टॉप २० मध्ये आलंय.

एका अहवालानुसार भारतीय आयुर्विमा महामंडळाने चौथ्या तिमाहीत १३,४२७.८ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. वर्षभरापूर्वी याच तिमाहीत एलआयसीचा नफा केवळ २,३७१ कोटी रूपये होता. विमा कंपनीने दि. २४ मे रोजी निकालात जाहीर केले की, कंपनीचा पहिल्या वर्षाचा प्रीमियम वार्षिक १२.३३ टक्क्यांनी घसरून रु. १२,८११.२ कोटी झाला आहे, तर मार्च तिमाहीत नूतनीकरण प्रीमियम ६.८ टक्क्यांनी वाढून रु. ७६,००९ कोटी झाला आहे. एलआयसीला कमिशनमधून ८४२८.५ कोटी रुपये मिळाले. हे मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ५.४ टक्के आणि मागील तिमाहीपेक्षा ३३.४टक्के अधिक आहे.चांगला नफा कमावल्यानंतर, विमा कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना परतीच्या भेटवस्तू देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने प्रति शेअर ३ लाभांश जाहीर केला आहे.



 
टॉप २० श्रीमंतांमध्ये गौतम अदानी
 
उद्योगपती गौतम अदानी यांच्या शेअर्समध्येही वाढ होत आहे. याचाच परिणाम म्हणून त्याने पुन्हा एकदा जगातील २० अब्जाधीशांच्या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. वृत्तानुसार, १८ मे रोजी अदानीची एकूण संपत्ती घसरणीसह ५२.४ अब्ज डॉलरवर आली. पण गेल्या तीन दिवसांत अदानीची एकूण संपत्ती ६४.२ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. याचा अर्थ १८ मे पासून गौतम अदानी यांच्या एकूण संपत्तीत ११.८ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे ९८ हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. यासह जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत २४ व्या क्रमांकावर असलेला अदानी आता थेट १८ व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
 
अमेरिकन फर्म हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. हिंडेनबर्गने आपल्या अहवालात अदानी समूहावर मनी लाँड्रिंग, अनधिकृत व्यापार, आर्थिक अनियमितता, प्रचंड कर्जे यासह अनेक गंभीर आरोप केले आहेत. परंतु या अहवालानंतर, अदानी समूहाच्या विरोधात चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने (एससी) स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीने अलीकडेच सांगितले होते की किंमतीतील फेरफारबाबत कोणतीही नियामक त्रुटी दिसली नाही.




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.