मुस्लीम मुलीला दुचाकीवरून ड्रॉप केले म्हणून कट्टरपंथींची विनोद कुमारला मारहाण

    25-May-2023
Total Views |
bijnor-4-muslim-youth-arrested-for-molesting-burqa-girls-going-with-hindu-on-bike

लखनऊ
: काही दिवसांपासून मुस्लिम मुलींना हिंदूंसोबत पाहिल्याबद्दल कट्टरपंथीयांकडून मारहाण आणि अत्याचार केल्यांच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये पोलिसांनी असे कृत्य करणाऱ्या चार तरुणांना अटक केली आहे. अल्तमास, फरदीन, मोहम्मद अनस, बिट्टू उर्फ ​​आमिर अशी त्यांची नावे आहेत.
 

हे आरोपी एका संघटनेच्या माध्यमातून काम करत असंत. मुस्लिम मुली हिंदूंसोबत दिसल्या की त्यांना अडवून व्हिडिओ बनवायचे. त्यानंतर मुलीच्या घरच्यांना याची माहिती द्याचे काम हे कट्टपंथी करत. डेहराडून-नैनिताल महामार्गावरील घटनेत या चौघांना २० मे रोजी अटक करण्यात आले आहे. चारही आरोपी शेरकोट येथील रहिवासी आहेत.त्याशिवाय २ साथीदारांचा शोध सुरू आहे.
 
एका घटनेनुसार अफजलगडमधील सलामतनगरचा रहिवासी विनोद धामपूरहून अफजलगडला जात होता. त्यावेळी वाटेत त्याला त्यांचा मुस्लिम मित्र आपल्या बहिणींसोबत बसची वाट पाहत असताना दिसतो. मात्र कोणतेच वाहन न मिळाल्याने विनोदच्या मित्राने त्यांच्याकडे बहिणीला घरी सोडण्याची विंनती केली. त्यानंतर विनोद त्या मुस्लिम मित्रांच्या बहिणीला घेऊन दुचाकीवरून निघून गेला.
 
मात्र डेहराडून-नैनिताल महामार्गावर येताच तीन दुचाकीस्वार त्यांच्या मागे लागले. घोसी गावाजवळ दुचाकीस्वारांनी विनोदची मोटारसायकल अडवली. तीन दुचाकीवर आलेल्या सहा तरुणांनी विनोदच्या मित्राच्या बहिणीशी गैरवर्तन करून व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली आणि विनोदला शिवीगाळ करून मारहाण केली.
 
त्यानंतर यासंबधी एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यात आरोपी विनोदला शिवीगाळ करताना आणि गैरवर्तन करताना दिसत आहे. आरोपी तरुण वारंवार तरुणींना दुचाकीवरून आलेल्या विनोदची माहिती विचारत आहेत. मुलींनी विरोध केल्यानंतर मुले त्यांच्या घरचा फोन नंबर मागतात. त्यानंतर विनोद त्या मुलींना घेऊन घरी जातो. त्यानंतर विनोद कुमारने त्या अज्ञात तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आणि ४ तरुणांना अटक केले आहे.
 
अलीकडच्या काळात देशाच्या विविध भागांमध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत, जेव्हा मुस्लिम मुलींसोबत दिसल्यामुळे इस्लामिक कट्टरतावादी गटांकडून हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. असभ्यता आणि मारहाणीसोबतच असे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहेत. २१ मे रोजी उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे एका मुस्लिम तरुणीला हिंदू मुलासोबत बाजारात खरेदीसाठी गेल्यांच्या कारणावरून अज्ञातांकडून मारहाण करण्यात आली होती.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.