उत्तराखंड : वंदे भारत एक्सप्रेस आता उत्तराखंडच्या सेवेत दाखल होणार आहे. . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. २५ मे रोजी हिरवा झेंडा दाखवत या नव्या सेवेला सुरुवात झाली .वंदे भारत उपक्रमांतर्गत देशातील रेल्वे प्रवास अत्याधुनिक करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. उत्तराखंडला पहिली वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील सर्वाधिक अत्याधुनिक एक्सप्रेस आहे. आत्मनिर्भर योजनेंतर्गत रेल्वेंची संख्या वाढविण्यावर केंद्राकडून प्रयत्न होत आहेत. त्यातून आता आणखी एक नवी ट्रेन उत्तराखडच्या सेवेत दाखल होईल. डेहरादून ते दिल्ली या मार्गावरुन वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. २५ मे रोजी हिरवा झेंडा दाखवत या नव्या सेवेला सुरुवात झाली .
दरम्यान, उत्तराखंड येथील एका शाळेने विद्यार्थ्यांना वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास घडविला. तेथील प्रवासी विद्यार्थ्यांनी माध्यमांना प्रतिक्रियादेखील दिली. वंदे भारत एक्सप्रेसही अत्याधुनिक सेवासुविधांनी युक्त असल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले. त्याचबरोबर या एक्सप्रेसमधून प्रवास हा अत्यंत जलदरीत्या होतो त्यामुळे निश्चितच वंदे भारत एक्सप्रेसही फार उपयुक्त असल्याचे विद्यार्थ्याने म्हटले.