‘स्वातंत्र्यवीर सावरकर वीरता पुरस्कार’ प्रदान ; दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या योगिता साळवी यांचाही गौरव

25 May 2023 22:39:19
savarkar award

मुंबई
: स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या १४०व्या जयंतीचे औचित्य साधत, राज्य शासनाचा पर्यटन विभाग आणि ‘विवेक व्यासपीठ’ (अमृत महोत्सवी सा. ‘विवेक’चा उपक्रम) यांच्या संयुक्त विद्यमाने, विविध क्षेत्रात लक्षणीय कार्य करणार्‍या मान्यवरांना ‘स्वा. सावरकर वीरता पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. लोकमान्य सेवा संघ पार्ले येथे गुरुवार, दि. २५ मे रोजी झालेल्या समारंभात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर वीरता पुरस्कार’ प्रदान आले. यात ‘लव्ह जिहाद’ विरोधात जनजागृती करणार्‍या दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी यांनाही ‘स्वा. सावरकर वीरता पुरस्कार’ प्रदान करुन गौरविण्यात आले.

स्वातंत्र्यवीर सावरकर वीरता पुरस्काराचे अन्य मान्यकरी डॉ. नीरज देव (जळगाव), दत्ताजी शिर्के (गडचिरोली), आबासाहेब कांबळे (सोलापूर) यांचा समावेश आहे. यावेळी पुरस्कार्थींच्यावतीने डॉ. नीरज देव आणि आबासाहेब कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. ‘विवेक व्यासपीठा’चे अध्यक्ष दिलीप करंबेळकर, ‘सिर्फ’ संस्थेच्या अध्यक्ष सुमेधा चीथडे, लोकमान्य सेवा संघांचे मुकुंद चितळे यांच्या हस्ते ‘स्वातंत्र्यवीर सावरकर वीरता पुरस्कार’ प्राप्त सन्माननीय पुरस्कारार्थींचा सत्कार सन्मान करण्यात आला. प्रदीप दादा रावत, आशुतोष अडोनी, पार्थ बावस्कर, सुमेधा चिथडे, प्रा. सचिन कानेटकर, अश्विनी मयेकर हे पुरस्कार निवड समितीमध्ये होते. यावेळी दिलीप कारंबेळकर आणि मुकुंद चितळे यांनी मनोगत व्यक्त केले.

दिलीप करंबेळकर म्हणले की, “हिंदूची वीरता ही विवेका सोबत जाते. त्यामुळे हिंदूची वीरता राष्ट्र आणि समाज कल्याणासाठी असते. यावेळी त्यांनी ‘स्वा. वीर सावरकर वीरता पुरस्कारा’चे प्रयोजन सांगितले. पुरस्कार निवड समिती संदर्भात माहिती दिली. पुरस्कार प्राप्त झालेले सर्वजण स्वा. सावरकरांच्या तेजस्वी वीर विचारावर राष्ट्र आणि समाजासाठी कार्य करतात त्यामुळे ‘स्वा. सावरकर वीरता पुरस्कारा’साठी त्यांची निवड झाली, असेही ते म्हणाले. मुकुंद चितळे यांनी सर्व पुरस्कार प्राप्त झालेल्यांचे अभिनंदन केले. तसेच, लोकमान्य सेवा संघ कायमच विवेकच्या कार्यासोबत आहे,” असे ते म्हणाले. यावेळी स्वा. सावरकरांच्या संगीत नाटकातील नाट्यपदे व त्यांच्या स्पुर्ती गीतावर आधारित मैफल नादब्रह्म पुणेनिर्मित अनाहत पुणे यांनी प्रस्तुत केलीया कार्यक्रमाला पार्ल्यातील स्वा. सावरकरप्रेमी उपस्थित होते.


Powered By Sangraha 9.0