केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मनोहर जोशींच्या भेटीला!

    25-May-2023
Total Views |
 
Manohar Joshi
 
 
मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी २५ मे रोजी सकाळी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे मनोहर जोशींना हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
 
बुधवारी हॉस्पिटलने जारी केलेल्या बुलेटिनमध्ये जोशी यांना ब्रेन ट्यूमरमुळे गुंतागुंत निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असून तो अजूनही अर्धचेतन अवस्थेत आहे. त्यांचे ब्रेन हॅमरेज स्थिर आहे. हिंदुजा रुग्णालयाने सांगितले की, ते अजूनही आयसीयूमध्ये असून त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.