जिओ फायबरचा धमाकेदार प्लान! हजार रुपयांत १४ OTT प्लॅटफॉर्म्स!

    25-May-2023
Total Views |
Jio Fiber plan OTT platforms for a thousand rupees!

मुंबई
: जिओ कंपनीद्वारे जिओ फायबर अंतर्गत एक नवा प्लान वापरकर्त्यांना खुला केला आहे. मात्र हजार रुपयांत १४ ओटीटी प्लॅटफॉर्म्स वापरता येणार आहेत. जिओ ब्रॉडबँड अंतर्गत हा खास प्लान वापरकर्त्यांसाठी कंपनाकडून ऑफर करण्यात आला आहे. या प्लानची खास गोष्ट अशी की, या दोन तीन नव्हे तर तब्बल १४ ओटीटी प्ल्रॅटफॉर्म्सची ऑफर ग्राहकांसाठी देण्यात आली आहे. त्यामुळे निव्वळ ९९९ रुपयांत १४ ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा आनंद युझर्सना घेता येणार आहे. ९९९ रुपयांत १४ ओटीटी प्लॅटफॉर्म्स यांचा वापर हा अमर्यादित असणार आहे. त्यात अॅमेझॉन प्राईम, डिझनी हॉटस्टार, जिओ सिनेमा, सोनी लिव्ह, झी5 यांसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा समावेश यात असणार आहे.

असा असणार आहे जिओचा ९९९ चा प्लान

हा जिओचा फायबर प्लान आहे. यात ३० दिवसांच्या वैधतेसह अनलिमिटेड डाटा वापरता येणार आहे. यात युझर्सला १५० एमबीपीएसच्या स्पीडने दररोज कितीही डाटा वापरता येणार आहे. त्यामुळे १५० एमबीपीएसने डाउनलोडिंग करत युझर्सना १४ ओटीटी प्लॅटफॉर्म्सचे फ्री सबस्क्रिप्शन करता येणार आहे. एकंदरीत ३० दिवस युझर्सना याचा मनमुराद आनंद घेता येणार आहे.

या ओटीटी प्ल्रॅटफॉर्म्सचे फ्री सबस्क्रिप्शन

जिओ सिनेमा, झी5, शिमारु मी, सोनी लिव्ह, डिझनी हॉटस्टार, जिओ सावन, अॅंमेझॉन प्राईम, अल्ट बालाजी , वूट किड्स, युनिवर्सल, डिस्कव्हरी इ.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.