देशात ५जी इंटरनेट तंत्रज्ञानाचा वेगवान विस्तार होणार

25 May 2023 18:57:52
5 G internet Ashwini Vaishnav

नवी दिल्ली
: देशात ५जी इंटरनेट तंत्रज्ञानाचा वेगवान विस्तार होत आहे. गेल्या आठ महिन्यात देशातील २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशातील ७०० जिल्ह्यांमधी तब्बल २ लाख ठिकाणांपर्यंत या सेवेचा विस्तार झाला आहे.

उत्तराखंडमधील गंगोत्री येथे २ लाखाव्या ५जी इंटरनेट साईटचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि केंद्रीय दूरंसचार, रेल्वे, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत ५जी साईटच्या प्रारंभासह डेहराडून येथे चारधाम यात्रेसाठीच्या फायबर दूरसंचार जोडणीचे राष्ट्रार्पण केले. यामुळे बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री अशा चार धाम तीर्थस्थळी देखील पजी मोबाईल नेटवर्क उपलब्ध करण्यात आले आहे. चारधाम यात्रा मार्गावरील बहुतांश टॉवर्सची जोडणी देखील पूर्ण झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ऑक्टोबर २०२२ रोजी देशात जी तंत्रज्ञानाची सुरुवात केली होती. त्यानंतर अवघ्या ७ महिन्यातच ७०० जिल्ह्यात २ लाख ठिकाणी या तंत्रज्ञानाची स्थापना करण्यात आली आहे. आता ५जी तंत्रज्ञान आता देशातील सर्व २८ राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशात सुरु करण्यात आले आहे. जगभरात केवळ भारतातच ५जी तंत्रज्ञानाचा हा सर्वाधिक वेगाने विस्तार झाला आहे.

देशात दर मिनिटाला १ ‘५जी’ साईट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत दूरसंचार क्रांतीचा साक्षीदार बनतो आहे. भारतात मिनिटाला एक साइट स्थापित केली जात आहे. आज चार धामांपैकी एक असलेल्या गंगोत्री इथे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीनुसार, देशाने ६जी तंत्रज्ञानातही पुढाकार घेतला असून देशात या तंत्रज्ञानाचे १०० हून अधिक पेटंट्स आहेत. अमेरिकेसारख्या विकसित देशांनीही भारताच्या ४जी आणि ५जी तंत्रज्ञानात रस दाखवला आहे, असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी सांगितले.



Powered By Sangraha 9.0