शेरलॉक होम्सने माझ्या आयुष्यात खूप लहानपणीच प्रवेश केला! - संदीप खरे

24 May 2023 19:20:04

sandeep khare 
 
मुंबई : शेरलॉक होम्स च्या पुस्तकाचा समावेश स्टोरीटेल वरील ऑडिओ बुक्स मध्ये करण्यात आल्यानंतर. त्यातील भाग कवी व गायक संदीप खरे हे देणार आहेत. त्यानिमित्त दिलेल्या मुलाखतीत संदीप यांनी आपल्या कथा विश्वातील शेरलॉक होम्स बद्दलच्या आठवणी सांगितल्या. शेरलॉक बद्दल वाचन केव्हा सुरु झालं हेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
 
संदीप म्हणाले, "शेरलॉक होम्स हे इतकं अद्धभुत व्यक्तिमत्व आहे, त्याने माझ्या आयुष्यात खूप लहानपणीच प्रवेश केला आहे. भालबा केळकर यांनी अनुवादित केलीली शोरलॉक होम्सची सर्व पुस्तके मी लहानपणी वाचली आहे. आणि जेव्हा हा प्रोजेक्ट करायचा असं मला स्टोरिटेलने सांगितले तेव्हा खूप आनंद झाला. कारण मला आठवतंय कि या कथा मी वाचून दाखविल्या आहेत, पण त्या स्टुडिओमध्ये नाहीत तर स्टुडिओ बाहेर. बालपणाच्या काळात आपण जे जे वाचतो त्यामध्ये 'फास्टर फेणे' असो वा 'टारझन' असो. त्यावयात असताना माझ्यावर शेरलॉक होम्सने एक वेगळीच छाप उमटवली होती. आणि हे फक्त माझ्या बाबतीतच घडले असे नाही, तर जगभरातील सगळ्यांवर या कथांनी मोहिनी घातली होती. हे सगळं अद्धभुत म्हणावं तसं शेरलॉक होम्सने जगावर पकड घेतली, त्यांच्या कथांची भाषांतरे जगातल्या सगळ्या भाषांमध्ये झाली. आणि ती इतकी लोकप्रिय झाली आहेत कि मी या 'ऑडिओबुक्स'मध्ये सुरुवातीला शेरलॉक होम्सबद्दल लिहिलं गेलं आहे ते सुद्धा वाचलं आहे. तेही ऐकण्यासारखं आहे. हे पात्र इतकं अजरामर झालंय कि ते खरोखरच होतं आणि अजूनही आहे असंच लोकांना वाटतंय. आजही लंडन येथील '२२१ बेकर्स स्ट्रीट'ला त्याचं क्रिएट घर, रुम आहे. तर सांगायचा मुद्दा म्हणजे त्यांनी मला तेव्हापासूनच झपाटलं आहे."
Powered By Sangraha 9.0