आंदोलन करणारी कुस्तीपटू विनेश फोगाट ही मंथरा : बृजभूषण शरण सिंह

    24-May-2023
Total Views |
brijbhushan sharan singh on vinesh phogat

नवी दिल्ली
: आंदोलन करणारी कुस्तीपटू विनेश फोगाट हिला भाजप खासदार आणि कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी मंथरा म्हटले आहे. विनेश फोगाट ही मंथरा आहे. रामायणातील मंथरा आणि कैकेयी सारखी विनेश माझ्याशी वागत असल्याचे बृजभूषण शरण सिंह म्हणाले. मंथरा आणि कैकेयी वाईट वागल्यानंतर सत्य जगासमोर आले होते. तसेच विनेश फोगाट हिने केलेल्या आरोपांमागील सत्य लवकरच समोर येईल. माझ्याविरोधात कट रचला आहे, असे ही बृजभूषण सिंह म्हणाले.

तुम्ही नशीबवान आहात की अशी एक केस आली आहे, ज्यात अडकून अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही त्रास सहन करावा लागला. माझ्या मते, हे कट कारस्थान आजचे नाही. हे खूप दिवसांपासून सुरू आहे. काहीतरी चांगले घडायचे असेल. त्यामुळेच हे घडत आहे. मात्र तुम्हाला सर्वकाही माहिती आहे की, पण आपण कसे जिवंत राहिलो, हे केवळ देवालाच माहीत, असे ही बृजभूषण सिंह म्हणाले.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.