केरला स्टोरी खरी आहे का? धीरेंद्र शास्त्री महाराजांनी केला महिलेला प्रश्न, उत्तर मिळालं...

    24-May-2023
Total Views |
bageshwar-dham-dhirendra-krishna-shastri-asks-kerala-woman-is-the-kerala-story-is-true


भोपाळ
: मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात हनुमान कथा करण्यासाठी आलेले बागेश्वर धाम सरकारचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी 'द केरला स्टोरी' या वादग्रस्त चित्रपटाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. दिव्य दरबारात त्यांनी केरळमधील एका महिलेची केरळमधील परिस्थितीबाबत विचारणा केली.

 
केरळच्या महिलेला विचारले - तिथली परिस्थिती कशी आहे?

बागेश्वर धाम सरकारचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री सागर जिल्ह्यातील जैसीनगरमध्ये हनुमान कथा सांगत होते. तिथे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी येथे दिव्य दरबाराचे ही आयोजन केले होते. यादरम्यान त्याला केरळमधील एका महिलेची चिठ्ठी मिळाली. त्यावेळी धीरेंद्र शास्त्री महाराजांनी तिला स्टेजवर बोलवले. त्यानंतर स्टेजवर येताच ती कुठून आली असे विचारले असता तिने केरळमधून सांगितले. केरळ ऐकल्यावर पंडित शास्त्रींनी त्या महिलेला विचारले की केरला स्टोरी खरी आहे का?यावर महिलेने उत्तर दिले की, चित्रपटातील काही घटना खऱ्या आहेत तर काही एडिट करण्यात आल्या आहेत.

'द केरला स्टोरी'वर काय म्हणाले धीरेंद्र शास्त्री

हनुमान कथेदरम्यान पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी लव्ह जिहाद आणि दहशतवादावर बनलेल्या 'द केरला स्टोरी' या चित्रपटाबाबत मोठे वक्तव्य केले होते. ते म्हणाले की, जे आहे ते चित्रपटात स्पष्ट दिसत आहे, आपण जे बोलत होतो ते चित्रपटात दाखवले आहे. देशाच्या प्रबोधनासाठी अशा आणखी चित्रपटांची गरज आहे. तसेच पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी दि. २१ मे रोजी कथेनंतर प्रश्नमंजुषा आयोजित केली होती. यादरम्यान जैसीनगर येथील एका तरुणाने ' द केरला स्टोरी' या चित्रपटाबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर महाराज म्हणाले की, हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित कथा आहे. ही देशाची सद्यस्थिती आहे आणि आपण सर्व हिंदू झोपेत आहोत. लोक मला म्हणतात की तुम्ही प्रक्षोभक विधान करता पंरतू आमचे शब्द प्रक्षोभक नसून हिंदूंना जागे करण्यासाठी आहेत. त्यामुळेच जे काही घडले ते या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.