नातं जपण्यासाठी शिवसेना आणि मातोश्री प्रसिद्ध: उध्दव ठाकरे

    24-May-2023
Total Views |
 
Uddhav thackeray
 
 
मुंबई : अरविंद केजरीवाल दुसऱ्यांदा मातोश्रीवर आलेत. नातं जपण्यासाठी शिवसेना आणि मातोश्री प्रसिद्ध आहे. राजकारणापलिकडे आम्ही नातं जपतो. लोकशाही आणि संविधआन टिकवण्यासाठी आम्ही एकत्र आहोत. दिल्लीतला अधिकारी पोस्टिंगचा कोर्टाचा निर्णय लोकशाही जपणारा आहे. अशी प्रतिक्रिया उ. बा. ठा गटाचे नेते उध्दव ठाकरे यांनी दिली आहे. अरविंद केजरीवाल यांनी उध्दव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
 
उध्दव ठाकरे म्हणाले, "आजपासून आपण सत्ताधाऱ्यांना विरोधी म्हटलं पाहिजे. गेल्या काही दिवसात सर्वोच्च न्यायालयाने दोन महत्वाचे निकाल दिले आहेत. आपच्या संदर्भात जो निर्णय दिला तो लोकशाहीसाठी आवश्यक होता. पण केंद्राने अध्यादेश आणला. राज्यात निवडणूक होणारच नाही अशी परिस्थिती निर्माण होईल. फक्त केंद्रात निवडणुका होतील."
 
उध्दव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांच्या भेटीनंतर संजय राऊत म्हणाले की, "आज केजरीवाल आले आहेत. आता जेव्हा केजरीवाल मुंबईत येतात तेव्हा ते मातोश्रीवर येतात. एक नवीन नातं निर्माण झाले आहे. आम्हाला काय करायचं आहे, पुढे कसं करायचं आहे याची चर्चा झाली. विरोधकांच्या एकजुटीसाठी अरविंद केजरीवाल यांचा मोठा वाटा आहे." असे त्यांनी सांगितले आहे.