वसीम-इक्राम चालवत होते IPL सट्टा! दुबई कनेक्शन आणि धक्कादायक गोष्टी उघड
24-May-2023
Total Views | 341
पुणे : पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने काही दिवसांपुर्वी छापा टाकत आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सुरु असलेल्या सट्टा रॅकेटचा पर्दाफाश केला होता. याप्रकरणी तिघाजणांना अटक करण्यात आलेली होती. दरम्यान, या सट्टेबाजीचे दुबई कनेक्शन समोर आले आहे. पुणे-मुंबई-नागपूर आणि दुबई असे या सट्टेबाजीचे लागेबांधे असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणार पब चालकासह व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वसीम हनीफ शेख (वय ३९, रा. साईबाबानगर, कोंढवा खुर्द), इक्राम मकसुद मुल्ला (वय २६, रा. मदने सोसायटी, घोरपडे पेठ) आणि मुसाबिन मेहमुद बाशाइब (वय ३५, रा. सोमवार पेठ) अशी अटक आरोपींची नावे आहेत. पबचालक जितेश मेहता (रा. पुणे) आणि सट्टेबाज अक्षय तिवारी (रा. इंदूर, मध्यप्रदेश) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल आहे़ इंदूरमधील सट्टेबाज अक्षय तिवारी याच्याशी मेहताचे लागेबांधे आहेत. आरोपी शेख, मुल्ला, बाशाइब या तिघांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने वाढ केली आहे. आरोपींनी सट्टेबाजासाठी तीन इमेल आयडीचा वापर केला असून तिवारी याचे बँक खाते गोठविण्याची प्रक्रिया सुरू आहे.