मविआ पाठोपाठ मनसेलाही मोठं खिंडार!

    24-May-2023
Total Views |
 
Hemant Gadkari
 
 
मुंबई : राज ठाकरेंचे खंदे शिलेदार आणि मनसेचे सरचिटणीस हेमंत गडकरींसह पूर्व विदर्भातील मनसेचे अनेक नेते लवकरच भाजपात करणार प्रवेश करणार आहेत. हेमंत गडकरी हे राज ठाकरेंचे जवळचे सहकारी असून गेल्या ३० वर्षांपासून ते ठाकरेंचे शिलेदार म्हणून ओळखले जातात.
 
विदर्भातील मनसे नेत्यांचा लवकरच भाजपात पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या नेत्यांच्या प्रवेशाबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा झाली असून हा पक्षप्रवेश केवळ औपचारिकता राहिला आहे.