सापनाथ-नागनाथ एकसाथ आओ मोदीजी को हराओं!

24 May 2023 18:15:23
 
Devendra Fadnavis
 
 
मुंबई : जे लोक लोकशाहीला मानत नाही, ते लोकशाहीवर बोलत आहेत. सापनाथ, नागनाथ सब साथ आओ, अशी त्यांची अवस्था झाली आहे. असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या दुसऱ्या टप्प्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती फडणवीसांनी दिली.
 
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "लोकशाहीत कावीळ झाल्यासारखं वागणं अत्यंत चुकीचं आहे. काँग्रेसी फक्त नव्या संसदभवनावर चर्चा करायचे, पण पंतप्रधान मोदींनी करुन दाखवलंयं. अगदी कमी वेळात हे संसदभवन एवढ्या भव्यतेने बनलं आहे. जगासमोर भारताची ताकद आलीय.
 
"केजरीवाल-ठाकरे यांच्या भेटीवरुन भाजपची ताकद दिसते. इंदिरा गांधी यांनी संसदेचं उद्घाटन केलेलं लोकशाही विरोधी होतं का? विरोधकांचा लोकशाहीच्या मंदिरावर विश्वास नाही. नवीन संसद भवन ही देशाची ताकद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करण्याचा ज्वर चढला आहे. त्यामुळे नवीन संसद भवनच्या उद्घाटनाला विरोध होतो आहे. आम्ही नवीन संसद भवन बांधू, अशी ओरड सर्वचजण करत होते. कोणालाही नवीन घर बांधता आलं नाही. मोदींनी ते करुन दाखलवं. जे लोक लोकशाहीला मानत नाही, ते लोकशाहीवर बोलत आहेत. सापनाथ, नागनाथ सब साथ आओ, अशी त्यांची अवस्था झाली आहे." अशी टीका फडणवीस यांनी विरोधकांवर केली.
 
 
Powered By Sangraha 9.0