आता भांग सेवन करण्यावर बंदी!

24 May 2023 15:28:35
 
consumption of cannabis
 
 
मुंबई : शिव मंदिरात भांग बंद करण्याचा निर्णय ओडिशा सरकारने २३ मे रोजी घेतला आहे. त्यानुसार ओडिशातील सर्व शिव मंदिरात यापुढे भांग सेवन करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित बाबा बलिया यांनी गांजावर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यानंतर ओडिशा सरकारने हे आदेश दिले आहेत.
 
ओडिशा सरकारने सांगितले की, ते राज्यभरातील शिव मंदिरांमध्ये गांजावर बंदी घालण्याची कडक अंमलबजावणी करेल. ओडिशा भाषा, साहित्य आणि संस्कृती विभागाने या प्रकरणी आदेश जारी केले आहेत. राज्यातील कोणत्याही शिवमंदिरात गांजा कोणत्याही स्वरूपात वापरू नये. असे सरकारने सर्व जिल्ह्यांना सांगितले आहे.
 
सांस्कृतिक मंत्री अश्विनी पात्रा म्हणाले की, ज्याप्रमाणे खुर्दा येथील बाणापूर येथील भगवती मंदिरात पशुबळी प्रथेवर बंदी घालण्यात आली होती आणि नंतर बहुतेक मंदिरांमध्ये बंदी घालण्यात आली होती, त्याचप्रमाणे ओडिशातील सर्व शिवमंदिरांमध्ये गांजाच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.
 
मात्र, काँग्रेसचे आमदार सुरेश राउत्रे यांनी या निर्णयाला विरोध केला. भांग भगवान नारायणाला, तर गांजा भगवान शिवाला अर्पण केला जातो. हे भोग आहेत आणि त्यांना प्रतिबंधित करू नये.
 
 
 
Powered By Sangraha 9.0