व्हॉट्सअप मेसेज संदर्भात मोठी बातमी!

23 May 2023 14:40:57
 
whatsapp
 
 
मुंबई : व्हाट्सअपने नुकतच ‘मेसेज एडिट’ फीचर लॉन्च केलं आहे. यामध्ये तुम्ही मेसेज पाठवल्यानंतर १५मिनिटापर्यंत तो मेसेज एडिट करू शकतात. व्हाट्सअप हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील सर्वात लोकप्रिय ॲप आहे. व्हाट्सअप वापरकर्ते अनेक दशकांपासून ज्या फिचरची वाट बघत होते, ते अखेर व्हाट्सअपवर आले आहे. कंपनीने वापरकर्त्यांसाठी ‘मेसेज एडिट' करण्याचा पर्याय उपलब्ध करुम दिला आहे. सध्या हे फिचरचा लाभ काहींसाठीच मर्यादित आहे. मात्र, लवकरच सर्वांना याचा लाभ मिळेल.
 
१५मिनिटानंतर तो मेसेज एडिट होऊ शकणार नाही. कॉल, मेसेज आणि मीडियाप्रमाणेच एडिटर मेसेज देखील एन्ट्रीएंड-टू-एंड एनक्रिप्टेड असेल.
 
 
मेसेज एडिट करण्याच्या पायऱ्या :
  • मेसेज एडिट करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम पाठवलेला मेसेज ‘Long-press’ करावा लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला ड्रॉप डाऊन मेनूमधून ‘Edit’ पर्याय निवडावा लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला पाठवलेला मेसेज एडिट करता येईल.
  • हा मेसेज तुम्हाला पाठवल्यानंतर १५ मिनिटापर्यंत एडिट करता येऊ शकतो.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0