
मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा नागरी परीक्षा २०२२ चा निकाल जाहीर झाला आहे. देशात पहिल्या दहा जणांमध्ये ६ मुलींनी बाजी मारली आहे. देशात पहिल्या दहा जणांमध्ये ६ मुलींनी स्थान मिळवले आहे. तसेच, काश्मिरा संखे ही महाराष्ट्रात पहिली तर देशात २५ वी आली आहे. त्याचप्रमाणे, महाराष्ट्रातून अन्य उत्तीर्ण परीक्षार्थी पुढीलप्रमाणे आहेत. रिचा कुलकर्णी (५४), जान्हवी साठे (१२७), सुरभी पाठक (१५६), ऋषिकेश शिंदे (१८३), वगिता जोशी (१९९), अर्पिता ठुबे (२१४), दिव्या अर्जून गुंडे (२६५), किर्ती जोशी (२७४), अमर राऊत (२७७), अभिषेक दुधाळ (२७८) या विद्यार्थ्यांनी युपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादित केले.
केंद्रीय आयोगाने निकाल जाहीर केला असून इशिता किशोरने पहिला क्रमांक पटकावला आहे. तसेच दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे गरिमा लोहिया आणि उमा हरिथ यांनी बाजी मारली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने दि. २३ मे रोजी नागरी सेवा परीक्षा २०२२ चा निकाल जाहीर केला आहे. दरम्यान, परीक्षार्थ्यांना हा निकाल युपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर पाहता येणार आहे. upsc.gov.in या वेबसाइटवर विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने दि. १८ एप्रिलपर्यंत मुखालती घेतल्या होत्या. त्यानंतर दि.२३ मे रोजी युपीएससीने हा निकाल जाहीर केला आहे.