व्हिडिओ : माजी उपमुख्यमंत्र्यांची पोलीसाने पकडली कॉलर!

23 May 2023 12:57:35
police-misbehaved-with-manish-sisodia
 
नवी दिल्ली : दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया यांना दि. २३ मे रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी सिसोदिया यांच्यासोबत केलेल्या गैरवर्तनाचे प्रकरण समोर आले आहे. यावेळी पोलीस सिसोदियांची कॅालर पकडून त्यांना घेऊन जाताना दिसले. याप्रकरणावर दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनीही ट्विट करत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. केजरीवाल म्हणाले की, पोलीसांना अशा प्रकारे गैरवर्तन करण्याचा अधिकार आहे का? अस कृत्य करण्याचे पोलीसांना वरिष्ठाकडून आदेश दिले गेले आहेत का? , असा सवाल केजरीवलांनी केला आहे.



या प्रकरणाशी संबंधित एक व्हिडिओ यापूर्वी दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांनी ट्विट केला होता. ज्यात त्यांनी लिहिले की, 'राऊस एव्हेन्यू कोर्टात एका पोलिसाने मनीषजींसोबत केलेले धक्कादायक गैरवर्तन. दिल्ली पोलिसांनी त्याला तात्काळ निलंबित करावे.त्यानंतर हा व्हिडीओ केजरीवालांनी ट्विट करत पोलिसांच्या या वागणुकीवर आक्षेप घेतला आहे.




यानंतर पोलीसांनी ट्विट करून आपली बाजू मांडली. ज्यात दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे की, 'राऊस एव्हेन्यू कोर्टात प्रॉडक्शनच्या वेळी मनीष सिसोदियासोबत पोलिसांनी केलेले गैरवर्तन हा अपप्रचार आहे. व्हिडिओमध्ये प्रसिद्ध केलेला पोलिसांचा प्रतिसाद सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यावश्यक होता. न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींनी माध्यमांना निवेदन देणे कायद्याच्या विरोधात आहे.


Powered By Sangraha 9.0