ब्रेकिंग न्यूज : 'या' महिन्यात अयोध्येतील राम मंदिर होणार दर्शनासाठी खुले!

23 May 2023 13:33:26
nripendra-mishra-says-ayodhya-ram-mandir-construction-first-phase-complete-december

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीच्या कामाचा पहिला टप्पा दि. ३० डिसेंबरपर्यत पूर्ण होणार आहे. रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी यासंबधी दि. २२ मे रोजी माहिती दिली. तसचे पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर भाविकांना राम मंदिरात प्रभू श्री रामाचे दर्शन घेता येणार आहे.

रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा म्हणाले की, राममंदिराच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याचे काम हे ३० डिसेंबरपर्यत पूर्ण होईल. त्यामुळे ३० डिसेंबर २०२३ पर्यत राम भक्तांना प्रभू श्री रामाचे दर्शन घेता यावे या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. तसेच पहिल्या मजल्यावर पाच मंडप असतील. यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे गर्भगृह आहे, जिथे भगवंताची मूर्ती स्थापित केली जाणार आहे.या पाच मंडपाच्या उभारणीसाठी १६० खांब वापरले जाणार आहेत.

दरम्यान रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने काही मूर्तींच्या निर्मितीचे फोटो ट्विट केले होते. तसेच श्री रामजन्मभूमी मंदिरातील खांब, पादचारी आणि इतर ठिकाणी सुशोभित करण्यासाठी शास्त्रीय ग्रंथांमध्ये वर्णन केलेल्या कथांच्या आधारे सुंदर मूर्ती तयार केल्या जात असल्याची माहिती मंदिर व्यवस्थापनाने दिली आहे.
 
Powered By Sangraha 9.0