मुस्लीम तरुणीसह हॉटेलमध्ये गेला नंतर जे घडलं त्यामुळे पश्चातापाची वेळ!

    23-May-2023
Total Views |
ly-dargah-organization-misbehaved-abuse-hindu-boy-muslim-girl-stay-in-hotel
 
लखनऊ : उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये एका मुस्लिम तरूणीसह हिंदू तरूण हॉटेलमध्ये गेला होता. त्यानंतर आला हजरत दरगाह या संघटनेशी संबधित काही जमात रझा-ए-मुस्तफा या संघटनेच्या सदस्यांनी या हॉटेलमधील रूममध्ये प्रवेश केला.त्यावेळी संघटनेच्या सदस्यांनी तरूणीशी आणि तरूणाशी गैरवर्तन केले. त्यानंतर या घटनेची दखल घेत बरेली पोलिसांनी कारवाई केली जाईल असे सांगितले आहे. पीडित तरुण हा रेल्वेचा कर्मचारी असल्याचे सांगण्यात येत आहे.हे प्रकरण बरेलीच्या जंक्शन रोडवर असलेल्या गेस्ट हाऊसशी संबंधित आहे. आला हजरत दरगाहाशी संबंधित असलेल्या जमात रजा-ए-मुस्तफा या संघटनेच्या लोकांना एक मुस्लिम मुलगी एका हिंदू मुलासोबत येथे राहात असल्याची माहिती मिळाली. यानंतर संस्थेचे अनेक लोक हॉटेलमध्ये घुसले आणि दोघे ज्या खोलीत थांबले होते तेथे पोहोचले. जमातच्या सदस्यांनी खोली उघडली आणि व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. मुलाचे नाव आशिष होते. ओळखपत्र तपासले असता ते रेल्वे कर्मचारी असल्याचे निष्पन्न झाले.

जमात रझा-ए-मुस्तफाच्या सदस्यांनी मुलीचा तिच्या संमतीशिवाय व्हिडिओ बनवला. ही तरुणी मूळची शाहजहांपूर येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे. ती एका खाजगी महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. यावेळी शोधासाठी आलेल्या जमावाने गेस्ट हाऊसमध्ये बराच वेळ गोंधळ घातला. गर्दीतील पुरुषांनी मुलीला पकडून तिचे नाव विचारले. तसेच मुलाला विचारले की, तू कोणत्या संस्थेशी संबंधित आहेस? तुम्ही मुस्लिम मुलीसोबत काय करत आहात? या प्रश्नांच्या उत्तरात आशिषने स्वत:ला मुलीचा मित्र असल्याचे सांगितले. मात्र, या उत्तराने जमातच्या सदस्यांचे समाधान झाले नाही.त्यानंतर त्यांनी तरूण तरूणीशी गैरकृत्य केले. बरेली पोलिसांनी या व्हायरल व्हिडिओची दखल घेतली आहे. आणि ४ ते ५ अज्ञात आरोपींविरुद्ध आयपीसी कलम ५०४ आणि आयटी कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला आहे.

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.