शिकाऱ्यांनी घेतला ‘फॉरेस्ट गार्ड’चाच जीव

ओडिशातील दुर्दैवी घटना

    23-May-2023
Total Views |bimal kumar jena


मुंबई (विशेष प्रतिनिधी): ओडिशा राज्यातील बारीपाडा येथे असलेल्या सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्पामध्ये शिकाऱ्यांकडुन फॉरेस्ट गार्डचा मृत्यु झाला आहे. बिमल कुमार जेना असे मृत वनरक्षकाचे नाव असुन भारतातील वन्यजीवांचे रक्षण करण्यासाठी तैनात असताना त्यांच्यावर हल्ला झाल्याचे समजले आहे.
पिथाबाटाची दक्षिण क्षेणी आणि नाना उत्तर क्षेणीच्या वनक्षेत्रात वनरक्षक पथकासह गस्त घालत असताना शिकाऱ्यांचा एक गट आढळुन आला. या गटाने घटनीस्थळावरुन पळुन जाण्याच्या प्रयत्नात गोळ्या झाडल्या तेव्हा जेना यांना छातीत गोळी लागली, अशी माहिती सुत्रांकडुन मिळाली आहे.
दरम्यान, ही माहिती जेना यांच्या पत्निला कळताच त्यांच्या तब्येतीवर परिणाम होऊन त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशी माहिती देण्यात आली आहे.
या संबंधी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भुपेंद्र यादव यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.