मोदीच बॉस! असं स्वागत रॉकस्टारचंही झालं नाही!

    23-May-2023
Total Views |
anthony-albanese-says-pm-narendra-modi-is-boss-australia-vedic-mantra-sydney-indian-community
 
सिडनी : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहेत. सिडनीतील कुडोस बँक एरिना येथे भारतीय समुदायाचा एक भव्य कार्यक्रम सुरू आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय त्यांचे ऑस्ट्रेलियन समकक्ष अँथनी अल्बानीज देखील आले आहेत.त्यावेळी पंतप्रधान मोदींचे तेथील भारतीयांनी पारंपरिक भारतीय पद्धतीने स्वागत केले. या कार्यक्रमाला हजारो लोक उपस्थित होते. त्यामुळे मोदी कार्यक्रमस्थळी पोहोचताच हजारो लोकांच्या आवाजाने शहर दुमदुमले.

दोन्ही पंतप्रधानांनी हस्तांदोलन करून जनतेचे अभिवादनही स्वीकारले. पंतप्रधान मोदी भारतीय समुदायालाही संबोधित करणार आहेत. 'मोदी-मोदी'च्या घोषणा देत लोकांनी त्यांचे भव्य स्वागत केले. यादरम्यान पीएम मोदी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्या कानात काही तरी बोलताना दिसले. त्यानंतर दोघेही हसले. त्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रगीत झाले. पंडितांनी वैदिक मंत्रोच्चारात पंतप्रधान मोदींचे स्वागत केले.

त्यामुळे भारतापासून हजारो किलोमीटर दूर ऑस्ट्रेलियासारख्या मोठ्या देशाच्या पंतप्रधानांसमोर वैदिक मंत्रांचे पठण करण्यात आले. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बॉस आहेत.” तसेच त्यांनी भारत भेटीची आठवण करून देत आपण गुजरातमध्ये होळी खेळलो आणि दिल्लीतील महात्मा गांधींच्या समाधीला हार घातला असल्यांची आठवण ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी करून दिली.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.