आदित्यचा मृत्यू संशयास्पद?

    23-May-2023
Total Views |
 
मुंबई : अभिनेता आदित्य सिंह राजपूतच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. ३२ वर्षीय आदित्यचा मृतदेह मुंबईतल्या अंधेरी इथल्या राहत्या घरी आढळला. त्याच्या मृत्यूविषयी अनेक समजुती गैरसमजुती समाज माध्यमांवर फिरत आहेत. त्याचं निधन नेमकं कोणत्या कारणामुळे झालं, असा प्रश्न चाहत्यांमध्ये निर्माण झाला आहे. ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे त्याचा मृत्यू झाला असं काही रिपोर्ट्स म्हणतायत. तर बाथरुममध्ये पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज काहींनी वर्तवला आहे. आदित्यच्या निधनाचं नेमकं कारण त्याच्या शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होईलच. मात्र त्यापूर्वी महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे.
 

aditya 
 
गेल्या काही दिवसांपासून आदित्यची प्रकृती ठीक नसल्याचे घरातील मोलकारीणीने नोंदवले आहे. त्याला गेल्या २ ते ३ दिवसांपूर्वीपासून उलट्या होत होत्या. उलटी करण्यासाठी आदित्य बाथरूम मध्ये गेल्यावर खाली पडून बेशुद्ध झाला. त्यानंतर सेवकाच्या मदतीने इस्पितळात नेले असता त्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे. दरम्यान त्याने मध्य किंवा अन्य कशाचे सेवन केले होते की नाही याची माहिती अहवालातून मिळू शकेल.
 
जेवण करणाऱ्या बाईंच्या सांगण्यावरून सकाळी त्याने नाश्त्यात पराठा झाला होता व त्यामुळेही त्याला उलटी झाली होती. दुपारच्या जेवणासाठी म्हणूनच खिचडी बनवण्याचे त्याने आचार्याला सांगितले होते. दरम्यान प्रकृती ठीक नसतानाही त्याने रविवारी मित्रांसोबत प्रतीकेली असल्याचे समजते.
 
आदितच्या हाऊसहेल्पने ताबडतोब धाव घेत वॉचमनची मदत मागितली. त्यानंतर वॉचमन घरी पोहोचला आणि त्याने आदित्यला उचललं. तोपर्यंत तो बेशुद्ध झाला होता आणि वॉचमनच्या मदतीने मोलकरीणीने आदित्यला बेडवर झोपवलं. वॉचमनने दिलेल्या माहितीनुसार बाथरुममधील टाइल्ससुद्धा तुटल्या होत्या. त्यानंतर जवळच्या रुग्णालयातील एका डॉक्टरांना बोलावलं गेलं. डॉक्टरांनी आदित्यला रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. या सर्व घडामोडींनंतर आदित्यच्या एका मैत्रिणीला आणि पोलिसांना याबद्दलची माहिती देण्यात आली.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.