ब्रेकींग न्यूज! UPSCचा निकाल जाहीर

23 May 2023 15:04:48
UPSC results 2022

नवी दिल्ली
: केंद्रीय लोकसेवा आयोगाने दि. २३ मे रोजी नागरी सेवा परीक्षा २०२२ चा निकाल जाहीर केला आहे. दरम्यान, परीक्षार्थ्यांना हा निकाल युपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर पाहता येणार आहे. upsc.gov.in या वेबसाइटवर विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. केंद्रीय आयोगाने निकाल जाहीर केला असून इशिता किशोरने पहिला क्रमांक पटकावला आहे. तसेच दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे गरिमा लोहिया आणि उमा हरिथ यांनी बाजी मारली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने दि. १८ एप्रिलपर्यंत मुखालती घेतल्या होत्या. त्यानंतर दि.२३ मे रोजी युपीएससीने हा निकाल जाहीर केला आहे.




Powered By Sangraha 9.0