शनी शिंगणापूरला भक्तांची अलोट गर्दी! देशभरातून लाखो भाविक दाखल!

23 May 2023 16:03:42
 
Shani Shingnapur
 
 
मुंबई : शिंगणापुरात दरवर्षी शनि जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. श्री शिंगणापूरची ख्याती एवढी आहे की, येथे दररोज १३ हजारांहून अधिक लोक दर्शनासाठी येतात आणि शनी अमावास, शनि जयंतीला होणाऱ्या जत्रेला सुमारे १०लाख लोकं येतात.या दिवशी शनिदेवाचा जन्मदिवस साजरा केला जातो. वैशाख वद्य चतुर्दशी- शनि जयंती सामान्यतः अमावस्येला येते. या दिवशी शिंगणापूर येथील शनिदेवाची मूर्ती निळ्या रंगाची दिसते. ५ दिवस यज्ञ आणि ७ दिवस भजन-प्रवचन-कीर्तनाचा सप्ताह कडक उन्हात साजरा केला जातो.
 
श्री शनि शिंगणापूर बद्दल प्रचलित आहे की, येथे ‘देवता आहेत, पण मंदिरे नाहीत’. घर आहे, पण दार नाही. झाड आहे, पण सावली नाही. भीती आहे, पण शत्रू नाही. नेवासा तालुक्यात सोनई गावापासून जवळच शनीचं शिंगणापूर येथे शनीदेव स्वयंभू पाषाण रूपात विराजमान आहेत. येथे श्रीशनैश्वराचे स्वयंभू जागृत देवस्थान असून शनिदेवाची मूर्ती ५ फूट ९ इंच उंचीची अशी शनिदेवाची मुर्ती असून ती रात्रंदिवस ऊन, थंडी, पावसात उघड्यावर असते.
 
 
 
Powered By Sangraha 9.0