संतापजनक! काँग्रेसतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना राहुल गांधींशी! - Video

    23-May-2023
Total Views |
Rahul Gandhi controversial Video

नवी दिल्ली : काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डल वरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आलेला आहे. या व्हिडीओत काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे काही छायाचित्र आहेत. तसेच या व्हिडीओत छायाचित्रामागे छत्रपती शिवाजी महाराजांवरील एक गाणे लावण्यात आले आहे. एकंदरीत छत्रपती शिवाजी महाराज आणि राहुल गांधी यांची तुलना करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वत्र संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेनी संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले , काँग्रेने लवकरात लवकर तो व्हिडीओ समाजमाध्यमावरून डिलीट करावा अन्यथा आम्ही आंदोलन करू , असा इशारा बावनकुळेनी राहुल गांधीना दिला आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.