नवी दिल्ली : भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधीना कर्नाटकात अभूतपूर्व असे यश मिळाले. त्यानंतर आता राहुल गांधीनी ट्रक ड्राव्हर्सच्या प्रश्नाकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राहुल गांधीनी चक्क ट्रकने प्रवास केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींनी ट्रकमधून प्रवास केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान बाला रोडवर एका ट्रकमधून प्रवास करत ट्रक ड्रायव्हरच्या समस्या राहुल गांधीनी जाणून घेतल्या.
समाजमाध्यमांवर त्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. गांधींच्या या कृतीचं समर्थन करणारे अनेक ट्विट समोर आले.यावेळी त्यांनी वाहनचालकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला असल्याचे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून सांगितले जात आहे.