त्र्यंबकेश्वर संदर्भात मोठा खुलासा, "गेल्या वर्षी तिघेजण पाच पावले..."

हिंदु धर्म रक्षणासाठी आम्ही सदैव सज्ज ; आ. नितेश राणे यांचे प्रतिपादन

    23-May-2023
Total Views |
Nilesh Rane Trimbakeshwar Temple Case

त्र्यंबकेश्वर
: "इतर धर्मीयांच्या प्रार्थना स्थळात जाताना आम्ही त्यांच्या प्रथा,परंपरेचे पालन करुनच जातो. त्याच प्रमाणे हिंदु प्रथा परंपरेचे पालन करुन कोणीही रांगेततून मंदिरात यावे, दर्शन घ्यावे त्यास कोणाचीही हरकत नाही, मात्र १३ मे रोजी संदल मिरवणुकीच्या वेळी जो प्रकार घडला, त्याचे सत्य एसआयटी चौकशीतून समोर येईलच. मागील वर्षी संदलच्या वेळी तीन चार युवकच चार पाच पावले आत आली होती, प्रकार लक्षात आल्यावर त्यांना अडविण्यात आले. मात्र, यावर्षी त्यांची हिंमत वाढली, यावेळी पंधरा वीस युवक होते. कर्नाटक निवडणुकीमुळे त्यांच्यात हवा भरली आहे. काही नेते त्यांच्यात हवा भरत आहे. हा एक लॅन्ड जिहादचा प्रकार आहे. त्रंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात ता. १३ मे रोजी अन्य धर्मीयांनी प्रवेशासाठी केलेला प्रयत्न निषेधार्थ असुन असे पुन्हा अगळिक करणार्‍या अन्य धर्मियांचे पारिपत्य केले जाईल" असे निलेश राणे यांनी ठणकावून सांगितले.

आद्य ज्योतिर्लिंग त्रंबकराज मंदिरात काही मुस्लिम धर्मीयांकडून चादर चढवण्यासह धूप दाखवण्याचा प्रकार नुकताच घडला, त्या पार्श्वभूमीवर आ. राणे यांनी त्रंबकेश्वर मदिराला भेट दिली. ते पुढे म्हणाले, "आम्ही येथे माजी मंत्री अथवा आमदार म्हणून आलेले नसून येथील सर्वांनाच कोणत्याही धर्मीयांकडून त्रास होणार नाही व होवू देणार नाही याची ग्वाही देण्यासाठी आलो आहोत. मंदिरात मंदिर बंद होण्याचा कालावधीत प्रवेशासाठी बळजबरी करणे व कोणतीही प्रथा वा परंपरा नसतांना कथोकल्पीत गोष्टी जोडुन त्यावर ताबा मिळविण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजेच त्यांची प्रवृत्ती दिसून येते.

राणे पुढे म्हणाले, हिंदु समाज कधीच कोणाचे वाईट करण्यासाठी पहिले पाउल टाकत नाही. त्यांना हिंदू धर्मातील प्रथा व पुजा मान्य असतील तर धर्म नियमानुसार दर्शन वा पूजा करता येईल. त्याच प्रमाणे पूर्वी दुसरा धर्म स्वीकारला आता पुनर्प्रवेश करावयाचा असल्यास त्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त चांगली व्यवस्था आहे. त्रंबकेश्वर हिंदू धर्मातील एक पवित्र ज्योतिर्लिंग असून येथील शांतता अबाधित असताना कोणाच्याही सांगण्यावरुन ती बिघडवणे व दुसऱ्या धर्मियांच्या भावना दुखविणार्यांना आता माफी नसेल" असेही राणे यांनी बजावले.

23 May, 2023 | 17:58

शिवसेनेचे संजय राऊत यांची महाआघाडीत आपला धर्म बदलला. आता त्यांनी हिंदुत्वाबद्दल न बोलने हिताचे राहील" असा टोला निलेश राणे यांनी लगावला. आम्ही वाद वाढविण्यासाठी नाही तर येथील बांधवांनी बोलावल्याने आलो आहे," असेही राणे म्हणाले.
येथील साधू महंत व विश्वस्त या सर्व घडामोडी बाबतीत सर्वांना खर्‍या घटना व येथील महत्व विषद करतील. आरोपींना अटक करण्यास विलंब का? असे पत्रकारांनी छेडले असता. गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ एसआयटी नेमली असून या प्रकरणाची सखोलपणे चौकशी करुन सत्य बाहेर येईल. पोलीस त्यांचे काम करीत आहेत त्यात अडचण नको. असे राणे यांनी सांगितले.


23 May, 2023 | 18:0

माजी आदिवासी मंत्री अशोक उईके म्हणाले, "महादेव आदिवासी लोकांचा देव आहे. त्यांना हिंदु महादेव कोळी संबोधतात. त्यांच्या अज्ञान व गरिबीचा फायदा अन्य धर्मियांद्वारा घेतला जाउन धर्मांतर केले जाते. याला पायबंद बसविला जात आहे. ते होवू नये व त्यांच्या बाबतीत चुकीचे प्रसिद्ध करुन आपल्या धर्मीयांची बदनामी करणे चुकीचे आहे. ते प्रथम थांबवले." निलेश राणे व माजी मंत्री उईके यांनी प्रथम भगवान त्रंबकेश्वराचे दर्शन घेतले. त्यानंतर मंदिराबाहेर येत मंदिराच्या उत्तर महाद्वारा समोर महाआरती केली. या वेळी हिंदु संघटना पदाधिकारी व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी कुशावर्त चौकात जाऊन महर्षी वाल्मिक ऋषींचे दर्शन घेतले.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.