नीरज चोप्रा जगात भारी! ठरला जगातील सर्वोत्तम भालाफेकपटू

23 May 2023 11:59:03
 
Neeraj Chopra
 
 
नवी दिल्ली : ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा पुरुषांच्या भाला फेकीत जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर पोहोचला आहे. या क्रमवारीत नीरज १४५५ गुणांसह अव्वल आहे. ग्रेनडाचा अँडरसन पीटर्स १४३३ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर टोकियो ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेता चेक प्रजासत्ताकचा जॅकुब वादलेच १४१६ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
 
२५ वर्षीय नीरज गेल्या वर्षी ३० ऑगस्टला जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला होता. त्या वेळी पीटर्स अव्वल क्रमांकावर होता. यंदाच्या मोसमात नीरजने दोहा डायमंड लीगमध्ये ८८.६७ मीटर कामगिरी नोंदवून सुवर्णपदक मिळवले होते. नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. चोप्राने ७ ऑगस्ट २०२१ रोजी हा करिष्मा केला. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा तो पहिला ट्रॅक आणि फील्ड अॅथलीट ठरला. एवढेच नाही तर भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारा तो दुसरा वैयक्तिक खेळाडू ठरला.
 
 
Powered By Sangraha 9.0