लोकसभेसाठी महाराष्ट्र भाजप एक्शन मोडवर

३१ मे पासून "मोदी @ ९" अभियानाला सुरुवात

    23-May-2023
Total Views |
Lok Sabha BJP Maharashtra

मुंबई
: वर्षभरावर येऊन ठेपलेल्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच कंबर कसून तयारी सुरु केली आहे. लोकसभा २०२४ च्या अनुषंगाने भाजपने निवडणूकपूर्व तयारी सुरु केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या आणि सरकारच्या ९ वर्षांच्या कार्यकाळाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी अभियानाची आखणी सुरु केली आहे. 'मोदी @ ९' नावाने भाजपने अभियान सुरु केले असून राज्यातील लोकसभा मतदारसंघनिहाय महासंपर्क अभियान राबवले जाणार आहे.

भाजपचे विधान परिषदेतील गटनेते आणि माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर या अभियानाची धुरा सोपवण्यात आली आहे. यया अभियानवर केंद्रीय भाजपकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार असून दिल्लीतील नेते या अभियानाची माहिती ठेवणार असल्याचे भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्र भाजपकडून राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात ३१ मे ते ३१ जून दरम्यान महा संपर्क अभियान आयोजित करण्यात आले आहे. प्रत्येक लोकसभा मतदार संघात केंद्र सरकारच्या योजनांची माहिती विविध घटकांना करुन दिली जाणार आहे. तसेच प्रत्येक लोकसभा मतदार संघात विकास यात्रेचे आयोजन देखील प्रदेश भाजपकडून करण्यात आले आहे. या विकास यात्रेच्या माध्यमातून मतदार संघात केंद्र सरकारकडून करण्यात आलेली मोठी कामे समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.