मुंबई : भांडुप खिंडीपाडा येथील हेअर कटिंग सलूनमध्ये काम करणाऱ्या २४ वर्षीय सैफ खानने १३ वर्षाच्या एका हिंदू मुलीला आमिष दाखवून पळवून नेले होते. त्यानंतर तिला त्याच्या मूळ गावी आझमगडला घेऊन गेला. तसचं तिचा मोबाईल देखील काढून घेण्यात आला होता. मुलीने वडिलांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर ५ दिवस मुंबई पोलिसांनी सैफ आणि मुलीचा शोध घेऊन अखेर त्यांना शोधून काढलं आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
सैफ खानला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. तर त्या मुलीला मुंबईमध्ये आणण्यात आली असून मी आज त्या मुलीच्या वडीलांना आणि मुलीला भेटलो असं देखील किरीट सोमय्या यांनी ट्विट करत म्हटलं आहे.