नोट बदलण्यासाठी खूप जास्त वेळ दिलाय : अजित पवार

23 May 2023 11:39:08
Ajit Pawar on demonetisation

मुंबई
: गेल्यावेळी झालेल्या नोटाबंदीमुळे लोकांना फार त्रास झाला. पंरतू त्या नोटाबंदीचा काहीही फायदा झालेला नाही.त्यानंतर आता पुन्हा २ हजाराच्या नोटीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पण नोट बदलण्यासाठी खूप जास्त वेळ दिलाय, असे विधान अजित पवारांनी केले आहे.

तसेच गरिबांकडे २ हजारांच्या नोटा कुठून येणार आहेत. त्याचबरोबर काळा पैसा बाहेर पडणार नसेल तर नोटाबंदीच्या निर्णयाचा उपयोग काय?,असा सवाल अजित पवांरांनी केला आहे. त्यामुळे नोटबंदीनंतर हवालामार्फत साडेचार हजार कोटी देशाबाहेर गेले,असा खळबळजनक दावा ही पवारांनी केला आहे.



Powered By Sangraha 9.0