विश्वास पाटील यांच्या 'रणखैंदळ' कादंबरीचे पुण्यात प्रकाशन

    22-May-2023
Total Views |

vishvas patil  
 
मुंबई : सुप्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या महासम्राट कादंबरीनंतर त्याचा दुसरा भाग रणखैंदळ कादंबरीचे प्रकाशन रविवारी पुण्यात झाले. काळे सभागृह, गोखले इन्स्टिट्यूट, बीएमसीसी रोड, पुणे येथे संध्यकाळी ठीक ४ वाजता अभिनेते व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. तसेच ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲड. उज्वल निकम हे सुद्धा उपस्थित होते.
 
याबाबत पुणेकरांना जाहीर आवाहन करत विश्वास पाटील म्हणाले, "शिवप्रेमी, शंभूप्रेमी आणि महाराष्ट्रप्रेमी वाचकांनो, रणखैंदळ "या माझ्या "महासम्राट" शिवाजीराजांच्या जीवनावरील कादंबरीच्या दुसऱ्या खंडाच्या प्रकाशन समारंभास झुंबडगर्दीने उपस्थित राहिल्याबाबत धन्यवाद."
 
सदर कार्यक्रमाचे आयोजन मेहता प्रकाशनतर्फे करण्यात आले होते. दुपारी ३ वाजल्यापासूनच वाचकांनी आणि चाहत्यांनी विश्वास पाटील यांच्यासोबत छायाचित्र घेण्यासाठी आणि कादंबरीवर स्वाक्षरी घेण्यासाठी गर्दी केली होती.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.