काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जात्यात आठा आणि उठाचे पीठ झाल्याशिवाय रहाणार नाही!

शिवसेना प्रवक्त्या प्रा डॉ. ज्योती वाघमारे.

    22-May-2023
Total Views |
shivsena Dr. Jyoti Waghmare on Uddhav Thackeray mva

मुंबई
: उद्धव ठाकरेंनी बेडकीचा कितीही फुगवून बैल केला तरी तो बैल आता बसलेला आहे. प्रत्यक्ष जागा वाटपापर्यंत तर त्या बैलाचा मच्छरच होईल. जर राष्ट्रवादी मोठा भाऊ काँग्रेस लहान भाऊ तर उबाठा हा काय सावत्र भाऊ आहे का? संजय राऊत डीएनए टेस्ट ची गोष्ट करतात म्हणजे दोन हाणा पण आम्हाला तुमचा भाऊ म्हणा हीच यांची भूमिका आहे का? अशी खरपूस टीका शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी केली आहे.

सचिन वाजेंनी केलेली सगळीच वसुली दोन हजार रुपयांच्या नोटांमध्ये असल्याने उद्धव ठाकरेंना टेन्शन आलय का??शिवसेना प्रवक्त्या प्रा डॉ ज्योती वाघमारे म्हणाल्या, आपल्याला अर्थसंकल्पातले काहीच कळत नाही याची जाहीर कबुली देणारे उद्धव ठाकरे नोटाबंदीच्या बाबतीत का बरं मत व्यक्त करतात? सर्वसामान्य लोकांना दोन हजाराच्या नोटाबंदीचा अजिबात त्रास होणार नाही. मात्र मुंबई महापालिका लुटणारे कोविडच्या काळात भ्रष्टाचार करून स्वतःचे खिसे भरणाऱ्या लोकांना मात्र नक्कीच याचा त्रास होईल.