धक्कादायक! सुप्रिया सुळेंचं लव्ह जिहादला समर्थन! तुष्टीकरणाच्या सर्व पातळ्या ओलांडल्या!

व्हायरल व्हीडिओवर समाजमाध्यमांमध्ये संताप

    22-May-2023
Total Views |
ncp mp Supriya Sule on Triple Talaq

मुंबई
: लव्ह जिहादचे समर्थन आणि तिहेरी तलाकला विरोध करणाऱ्या आशयाचा सुप्रिया सुळेंचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात सुप्रिया सुळेंच्या तोंडी असलेली वाक्ये ऐकून अनेकांना धक्काच बसत आहे. एका लोकप्रतिनिधीकडून अशाप्रकारचे वक्तव्य कसे केले जाऊ शकते, असा सवाल आता नेटकरी विचारू लागले आहेत. यात सुप्रिया सुळे करत असलेल्या वक्तव्यांमुळे लव्ह जिहादला पूरक असा संदेश दिला जात आहे. तर दुसरीकडे तिहेरी तलाकविरोधातही त्यांनी अशीच गरळ ओकली आहे.

देशाच्या संसदेत मंजूर झालेल्या तिहेरी तलाक विरोधी कायद्याला सुप्रिया सुळे लांगूलचालनासाठी विरोध का करताना दिसत आहेत, असा सवालही आता विचारला जात आहे. सुप्रिया सुळेंनी हे भाषण कुठे केले हा व्हीडिओ नेमका कुठला आहे. याबद्दल आम्ही पुष्टी केलेली नाही. मात्र, त्यातील वक्तव्याने सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे. जबाबदार लोकप्रतिनिधींकडून अशा प्रकारची वक्तव्ये कशी केली जाऊ शकतात, असा सवाल आता विचारला जात आहे.

सुप्रिया सुळे व्हीडिओत नेमकं काय म्हणाल्या?

"काही दिवसांपूर्वी मला एक आई आणि दोन मुली बुरखा घालून भेटायला आल्या. त्या दोन मुली डॉक्टर होत्या. हे ऐकून मला आनंद झाला. कुठे प्रॅक्टीस करता, असं मी त्यांना विचारलं. त्यावर आम्ही औरंगाबादला असतो. असं त्यांनी म्हटलं, त्यावर मी मला नक्की भेटा, असंही बोलले. त्यानंतर मी त्यांना विचारलं, एक गोष्ट विचारू का? त्यावर त्या सुप्रिया सुळेंना म्हणाल्या विचारा. तिहेरी तलाक अस्तित्वात रहायला हवा की हटवायला हवा? त्यावर मी त्यांना विचारलं. जर तुमचा पती कधी तुमच्यावर नाराज झाला तर? त्यावर ती म्हणाली, याबद्दल तुम्हाला काय करायचंयं. मी त्यांची माफी मागितली. पण म्हटलं, तुमच्या पतीविरोधात काय बोलायचं नाही. पण मला तिहेरी तलाक पद्धती का असायला हवी, ते आम्हाला समजवा प्लिज.", अशी विचारणा सुप्रिया सुळेंनी त्या तिघींना केली.

पुढे त्या म्हणाल्या, "त्यापैकी एक जण होती ना तिचं नाव किरण कुलकर्णी होतं. तिनं मुस्लीम मुलाशी निकाह केला. कुराण वाचली. कुराणच्या गोष्टी तुम्हाला (उपस्थित जनसमुदाय) माहिती नसतील तितक्या कुराणाच्या गोष्टी मला किरण कुलकर्णीनं सांगितल्या. मी या मुद्द्यावर तिच्याबद्दल अधिक बोलली आहे. मी पुढे किरणला विचारलं, "किरण तू आंतरधर्मीय विवाह केलास?" त्यावर ती म्हणाली होय, "मी केलं", तिला विचारलं, "मग हे सगळं कसं सांभाळतेस?" त्यावर ती म्हणाली, "मी सगळं नीट सांभाळते." सासरी जाते तेव्हा मुस्लीमरिती रिवाज सांभाळते. माहेरी येते तेव्हा घरच्यांप्रमाणे राहते." "अरे वा तुझं तर चांगलं आहे.", असं सुप्रिया सुळे तिला म्हणाल्या.

तिहेरी तलाकचं समर्थन!

असं म्हणत सुप्रिया सुळेंनी तिहेरी तलाकचं समर्थन केलं. तिहेरी तलाक हा कायदा अस्तित्वातच असायला हवा. तिहेरी तलाकमुळे कुणाच्याही पतीवर तुरुंगात जायची वेळ येऊ नये. मी या संदर्भात संसदेतही भाषण केलं तेव्हा मी एक आई म्हणून भाषण केलं. पती कसाही असेल त्याला तुरुंगात टाकलं जाऊ शकत नाही. आम्ही आमचं पाहून घेऊ.

सुप्रियाताई त्या महिलांचं काय?

तिहेरी तलाकचं समर्थन करणाऱ्या सुप्रिया सुळेंना या कुप्रथेमुळे रस्त्यावर येणाऱ्या महिलांचा सोयीस्कर विसर कसा पडला? लांगुलचालनासाठी कुठली पातळी आपण गाठत आहोत याचे भानही जबाबदार लोकप्रतिनिधींना राहू नये का? तीन तलाक देऊन मुस्लीम समाजातील महिलांना मुला-बाळांसकट रस्त्यावर आणले जाते. या प्रकारावर सुप्रियाताई काय बोलणार? आजही बऱ्याच मुस्लीम देशात तीन तलाक विरोधात कायदा लागू करण्यात आला आहे. याबद्दल त्यांचे म्हणणे काय?, असे सवाल समाजमाध्यमांवर भाषणाचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर विचारला जात आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.