पुण्यात केरला स्टोरीला विरोध, निर्माते भूमिकेवर ठाम

22 May 2023 16:09:18

kerla story 
 
मुंबई : 'द केरल स्टोरी' रिलीज झाल्यापासूनच प्रेक्षकांच्या मनात आणि बॉक्स ऑफिसवर छाप पाडत आहे. रिलीजच्या तीन आठवड्यात या चित्रपटाने 200 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. प्रेक्षक या चित्रपटाला मनापासून पाठिंबा देत असून, निर्माते विपुल अमृतलाल शाह चित्रपटासाठी कठोर मेहनत घेत आहेत. ते सतत लोकांना भेटून आणि चित्रपटाबद्दल त्यांची मते मांडून त्यांच्यासाठी स्क्रीनिंगची व्यवस्था करत आहेत.
 
काल रविवारी चित्रपट निर्माते विपुल शाह, दिग्दर्शक सुदिप्तो सेन आणि अभिनेत्री अदा शर्मा पुण्यात आले आणि त्यांनी दिवसभरात आयोजित सहा विविध उपक्रमांमधून प्रेक्षकांशी संवाद साधला.
 
मात्र, पुणे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) च्या विद्यार्थ्यांमध्ये 'द केरल स्टोरी' या चित्रपटाबाबत वाद निर्माण झाला असून, एफटीआयआयच्या एका गटाने चित्रपटाच्या समर्थनार्थ तर दुसऱ्या गटाने चित्रपटाला विरोध केला. वाढता तणाव आणि चित्रपटसृष्टीतील व्यक्तींच्या आगमनाची माहिती मिळताच सुमारे दीडशे पोलिसांचा बंदोबस्त करून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आणि त्यांच्या उपस्थितीत चित्रपटाचे प्रदर्शन झाले.
 
पुण्यातील महर्षी कर्वे विद्यालयात शिकणाऱ्या हजारो विद्यार्थिनींसाठी स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते, जेणेकरून तरुणींची दिशाभूल कशी होते आणि मुलींची दिशाभूल झाल्यानंतर त्यांना कोणत्या प्रसंगांना आणि परिस्थितींना सामोरे जावे लागते, हे चित्रपटाच्या माध्यमातून समजावे.
Powered By Sangraha 9.0